नांदेड(प्रतिनिधी)-आर्य चाणक्य सेना नांदेड यांच्या वतीने वेद विद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना स्वेटर चे वाटप करण्यात आले श्री समर्थ वेद विद्यालय ढालेगाव या ठिकाणी वेद विद्यालयात शेकडो विद्यार्थी वेद पठण करून त्याचा अभ्यास करत आहेत . यावर्षी थंडी खूप मोठ्या प्रमाणात पडलेली असून पाठशाळेमध्ये लहान लहान मुले अध्ययन करत आहेत पाठशाळामध्ये पहाटे लवकर उठून स्नान संध्या वंदन करून वेध अध्ययन करण्यासाठी बसावं लागत असतं त्यामुळे त्यांचा थंडीपासून बचाव व्हावा या उद्देशाने कृष्णा बेरळीकर जिल्हाध्यक्ष आर्य चाणक्य सेना यांच्या वतीने स्वेटर व उबदार वस्त्रांचे वाटप करण्यात आले यावेळी पाठशाळेचे व्यवस्थापक अध्यापक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
