खांडल समाजातील प्रत्येक व्यक्तीने समाजाच्या एकजुटीसाठी प्रयत्न करावा-अनिल खांडल

लातूर(दिपक बढाढरा)-खांडल समाजातील एकजुट वाढविण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपसातील मतभेदांना विशेष महत्व न देता एकजुटीला महत्व द्यावे असे आवाहन राजस्थान खांडल विप्र प्रदेश संघटनेचे अध्यक्ष अनिल खांडल यांनी केले.

आज लातूर येथील कस्तुरी मंगल कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश खांडल विप्र संघटनेने राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल बोचीवाल आणि राष्ट्रीय महिला अध्यक्षा मृदुला बिलवाल यांच्यासह समाजातील यशवंत युवक युवतींचा सन्मान समारोह आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीची तिसरी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अनिल खांडल बोलत होते. हा सर्व कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश खांडल विप्र संघटनेचे अध्यक्ष जयनारायण रुथळा यांच्या अध्यक्षतेत झाला.

सर्व प्रथम राजराजेश्र्वर भगवान श्री. परशुरामजी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. दिपप्रज्वलन झाले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यात राज्यभरात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आणि यशसंपादन केलेले, एकूण 39 व्यक्तीमत्वांचा सन्मान झाला. त्यात नांदेड येथील डॉ.दिपेश द्वारकादास शर्मा आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक कान्होपात्रा शर्मा यांचाही समावेश होता. लातूर येथील बालिकांनी गणेश वंदनेने या समारोहाची सुरूवात केली. राज्यभरातून आणि वेगवेगळ्या राज्यातून जवळपास 500 खांडल विप्र संघटनांचे सदस्य या समारोहात सामील झाले होते. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश रुथळा यांनी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल बोचीवाल आणि राष्ट्रीय महिला अध्यक्षा मृदुला बिलवाल यांचा यथोचित सन्मान केला.

मुख्य नांदेड खंडेलवाल समाजाच्यावतीने ऑस्ट्रेलिया येथून आलेली युवती सौ.निलम प्रकाश बोचीवाल, शिरीष पांडे, रामप्रसाद चोटीया, गोपीकिशन पिपलवा, अनुलाल पिपलवा,द्वारकादास माटोलीया, बालाप्रसाद पिपलवा, शिवा डिडवाणीया, उमेश परवाल, दिपक बढाढरा, कैलास काछवाल, धिरज बढाढरा, महेश माटोलीया, पियुश बढाढरा, जितेंद्र माटोलिया, शैलेंद्र डिडवाणीया, शैलेश झिकनाडीया, निहाल झिकनाडीया, निखील झिकनाडीया यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल बोचीवाल आणि महिला राष्ट्रीय अध्यक्षा मृदुला बिलवाल यांचा सत्कार केला.

या प्रसंगी पुढे बोलतांना राजस्थान खांडल प्रदेश संघटनेचे अध्यक्ष अनिल खांडल म्हणाले अखिल भारतीय खांडल विप्र महासभेच्या स्थापनेला 100 वर्ष झाले आहेत. या 100 वर्षांचा ईतिहास आम्ही वाचला पाहिजे, तो समजून घेतला पाहिजे, तरच भविष्यात संघटनेसाठी आम्हाला काय करता येईल, काय करायला हवे हे समजेल. आपसातील मतभेद विसरुन समाजातील प्रत्येक व्यक्तीने समाजाला काय देता येईल याचा विचार करावा. त्यानंतरच आम्हाला समाजाकडून काही अपेक्षा करता येईल. आपल्या जीवनातील ईतिहास सांगतांना अनिल खांडल यांनी सांगितले की, मी पाच वर्ष पंतप्रधान सुरक्षेत काम केले. मी युगोस्लाव्हीयामध्ये शांतीसेनेत काम केले आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या घटनांमुळे आपसातील एकजुट विघटीत झाली तर त्याचे परिणाम काय होतात. याची जाणीव मला असल्याने मी समाजाच्या एकजुटीचा संदेश आपल्यासमोर मांडत आहे. समाजात पती-पत्नींमध्ये होणारी भांडणे ही पोलीस ठाणे, न्यायालयाकडे जातात आणि त्यात पुन्हा श्रम शक्ती आणि अर्थशक्तीचा व्यय होतो. परंतू हाती मात्र काहीच लागत नाही. समाजातील ज्येष्ठ नागरीकांनी, पती-पत्नींच्या जवळच्या नातलगांनी, समाजातील शासकीय नोकरीत असणाऱ्या लोकांनी अशा प्रकरणांमध्ये आपली शक्ती लावावी आणि पती-पत्नींमध्ये झालेला वाद सोडविण्यासाठी प्रयत्न करावे.

शेवटी तडजोड करायची असतेच तर त्यापेक्षा सुरूवातीपासूनच तडजोडीची भाषा करा. जेणे करून समाजाचे विघटन थांबेल आणि समाज उन्नतीच्या दिशेने धावेल. माझ्या शब्दांमधील सांगितलेली विनंती सुध्दा समाज सेवाच आहे. तेंव्हा कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणाचे ऐकून आपण वाईट दिशेला जावूू नका असे आवाहन अनिल खांडल यांनी केले.

राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल बोचिवाल म्हणाले समाजाच्या दृष्टीकोणातून सर्वच प्रकारची मदत करण्यास मी नेहमी तयार आहे. शिक्षणात जास्तीत जास्त युवक-युवतींना मला कसे पुढे नेता येईल यासाठी मी अविरत प्रयत्न करणार आहे. राष्ट्रीय महिला अध्यक्षा मृदुला बिलवाल म्हणाल्या, आजच्या परिस्थितीत व्यापाऱ्यांच्या मुलांना आपल्या मुली देण्यासाठी समाजातात समस्या दिसत आहेत. व्यापार करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यक असते. म्हणून व्यापाऱ्यांची मुले लहानपणापासूनच व्यवसायात गुंततात आणि त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. पण ती मुले चांगली असतात. यामुळेच खांडल समाजाने विचार करावा.

मोठ-मोठ्या समारोहांमध्ये जेवणाच्या ताटात अनेक जण जेवण सोडून देतात ही सुध्दा दुर्देवी बाब आहे. त्याकडे समाजातील प्रत्येक व्यक्तीने लक्ष द्यावे. समाजीक संकेतस्थळांवर प्रसिध्द केल्या जाणाऱ्या आपल्या कुटूंबातील फोटो बद्दल सुध्दा मृदुला बिलवाल यांनी आक्षेप घेत असे न करण्याची सुचना केली.

या कार्यक्रमानंतर लातूर खांडल शाखा सभेच्यावतीने अनेक युवक-युवतींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या समारोहात प्रा. लक्ष्मीकांत गौड आणि त्यांचे सहकारी मधुकर लाडेकर यांनी तयार केलेल्या खांडल समाजाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी संकेतस्थळ तयार करणाऱ्या अभियंत्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल बोचीवाल यांनी स्वागत केले. महाराष्ट्र प्रदेश संघटनेचे सरचिटणीस शांतीलाल काछवाल यांनी आजच्या समारोहाची प्रस्तावना केली. आजच्या कार्यक्रमात विठ्ठल रुक्माईची प्रतिमा देवून राष्ट्रीय अध्यक्ष आणि महिला अध्यक्षांचा सन्मान प्रदेश संघटनेने केला. आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश खांडल संघटनेचे युवक अध्यक्ष भगवानदास रुथळा यांचा शपथ ग्रहण सामारोह झाला. आजच्या कार्यक्रमात राजस्थान येथील अनिल नवहाल, उज्जैन येथील शिवजी माटोलीया, जालना येथील बंकटलाल रिणवा, हैद्राबाद येथील श्रीनिवास रिणवा, मंचिरीयाल येथील मथुरालाल रिणवा, गुलबर्गा येथील झुंबरलाल रिणवा, मुंबई येथील रामअवतार चोटीया यांचा सन्मान करण्यात आला. हैद्राबाद खांडल विप्र शाखेच्यावतीने केशव रिणवा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष आणि महिला अध्यक्षांचा सत्कार केला. या कार्यक्रमात उपस्थितांमध्ये महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या महिला अध्यक्षा संगिता पिपलवा यांचाही सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ.सौ.दुर्गा मुकूंद सेवदा आणि सौ.सरिता बढाढरा यांनी अत्यंत उत्कृष्टपणे केले. कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्याची जबाबदारी लातूर शाखेचे अध्यक्ष संजय रुथळा यांनी पार पाडली.

खंडेलवाल समाजातील युवक-युवतींना शिक्षण घेण्यासाठी देशभरात विविध सुविधा उपलब्ध आहेत. परंतू महाराष्ट्रातील पुणे शहर ते शिक्षणासाठी पंढरी मानले जाते आणि या शिक्षण पंढरीमध्ये खंडेलवाल समाजाच्या युवक-युवतींना शिक्षण घेण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल बोचीवाल यांनी जागा उपलब्ध करून द्यावी असे निवेदन हिंगोली शाखेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्षांना देण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *