नांदेड (प्रतिनिधी)-दि. 9 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता बाफना पुलावर माझ्यावर फायरिंग झाली अशी माहिती इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सौ.सविता बाबुराव गायकवाड यांनी पोलीसांना दिली. त्याबाबत सविता गायकवाड यांच्या तक्रारीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.घटनेला 48 तास पुर्ण होण्याअगोदर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक, अत्यंत चाणाक्ष अधिकारी, खडानखडा माहिती असणारे अधिकारी श्री.द्वारकादासजी चिखलीकर यांनी हे गोळीबार प्रकरण बनावट असल्याचे सप्रमाण सिध्द केले.
सविता गायवाडी यांनी 9 जानेवारी रोजी आपल्यावर झालेला गोळीबार रहिमान खान नुरखान आणि त्याचा भाऊ जाफर रा.परभणी आणि त्याच्यासोबत एक अनोळखी अश्या तीन जणांनी केला असल्याची तक्रार दिली. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्ह्यातील अत्यंत चाणक्ष अधिकारी द्वारकादासजी चिखलीकर यांना या प्रकरणाचे सत्य शोधण्याची जबाबदारी दिली. गोळीबाराच्या घटनेला अद्याप 48 तास पुर्ण झाले नाहीत. पण स्थानिक गुन्हा शाखेने हा गोळीबार प्रकार खोटा असल्याचे दाखवून दिले. पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार 10 जानेवारी रोजी रात्री परभणी येथील रहिमान खान नुरखान आणि त्याचा भाऊ जाफर या दोघांना ताब्यात घेतले. परंतू त्यांनी गुन्हा केला नसल्याची खात्री पोलीसांना पटल्यानंतर तपासाची चक्रे उलट दिशेने फिरणे सुरू झाली.
तेव्हा सत्य बाब असी उघड झाली की, मागील सहा महिन्यापुर्वी आयचर वाहन चोरी प्रकरणात पोलीस ठाणे भोकर येथे रहीमखान रा. परभणी याने सौ. सविता गायकवाड व तीचा साथीदार आतीकखान रा. नांदेड यांचे नांव घेतले होते. त्यामुळे त्या घटनेचा राग मनात धरुन दि.6 जानेवारी 2023 रोजी रात्री 10 वाजता सौ. सविता गायकवाड व फैसल यांनी किरायाची चारचाकी गाडी घेऊन रहीमखान याचे घरी परभणी येथे गेले होते. तेथे रहीमखान व सविता गायकवाड यांचा वाद झाला, त्यातुन रहीमखान याने पोलीस ठाणे मोंढा, परभणी येथे सविता गाकयावाड हीचे विरुध्द दि. 7 जानेवारी रोजी पोलीस ठाणे मोंढा परभणी गुन्हा क्रमांक 04/2023 कलम 452, 323, 504, 506, 34 भादंवि चा गुन्हा दाखल केला होता. त्यावरुन तीचे मनात रहीमखान व त्याचा भाऊ जफरखान यांचे बाबत मनात राग आला. त्यांना कसेही करुन कोणत्याही गुन्हयात फसविण्याचा ठाम सविता गायकवाड हीने निर्णय घेतला.
आज दि. 11 जानेवारी रोजी गुन्हयाच्या घटनेमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक श्री.द्वारकादासजी चिखलीकर आणि त्यांचे सहकारी अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी संशयीत आरोपी किरण सुरेश मोरे रा. धनेगांव व आवधुत ऊर्फ लहुजी गंगाधर दासरवाड रा. बळीरामुपर नांदेड यांना ताब्यात घेऊन विचारपुस केली असता, त्यांनी सदर गुन्हयाचा व रचण्यात अलेल्या कटाचा सर्व उलघडा केला. त्यांनी सांगीतले की, दि. 9 जानेवारी 2023 रोजी सौ. सविता गायकवाड हीने गोपिनाथ बालाजी मुंगल रा. धनेगांव व किरण सुरेश मोरे रा. धनेगांव, आवधुत ऊर्फ लहुजी गंगाधर दासरवाड रा. बळीरामुपर, विकास कांबळे रा. हदगांव ह.मु. धनेगांव यांना फोन करुन घरी बोलावुन घेऊन, मला परभणी येथील रहेमतखान व जफरखान हे परेशान करीत आहेत, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केले आहेत, मला त्यांना धडा शिकवायचा आहे, असे म्हणुन किरण मोरे व गोपीनाथ मुंगल यांना पिस्टल घेऊन बाफना येथे या, मला गोळी मारुन निघुन जा असे सांगीतले. त्या प्रमाणे किरण मोरे व गोपिनाथ मूंगल यांनी पिस्टल घेऊन बाफना येथे आले. सविता गायकवाड ही त्या दोघांची वाट पाहात बाफना उड्डाण पुलावर थांबली होती. किरण मोरे व गोपिनाथ मूंगल हे तेथे आले. त्यानंतर बाफना पुलावर किरण मोरे हा ये-जा करणारे वाहनावर वॉच ठेवुन होता, त्याच रात्री 11 वाजता बाफना उड्डाणपुलावर कोणीही नसल्याची संधी साधुन सविता गायकवाड हिने सांगीतल्या प्रमाणे गोपिनाथ मुंगल यांने सविता गायकवाड हीचे डाव्या दंडावर पिस्टलमधुन एक गोळी मारुन जखमी केले. त्यानंतर तेथुन गोपिनाथ मुंगल व किरण मोरे हे निघुन गेले. त्यानंतर सविता गायकवाड ही फोन करुन परभणी येथील रहीमखान व त्याचा भाऊ जफरखान यांनी मला रस्त्यात बाफना उड्डाणपुलावर अडवुन गोळी मारुन मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांना बोलावुन घेतले. घटनप्रमाणे पोलीसांनी सविता गायकवाड हीस तात्काळ सरकारी दवाखाना, विष्णुपुरी नांदेड येथे नेऊन दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. सविता गायकवाड यांच्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे इतवारा येथे गुन्हा नोंद क्रमांक 12/ 2023 कलम 307, 34 भादंवि सहकलम 3/25 शस्त्र अधिनियम नुसार दाखल आहे.
त्यानंतर सविता गायकवाडवर फायरींग करण्यासाठी वापरलेली पिस्टल गोपिनाथ मुंगल व विकास कांबळे हे घेवून पळुन गेले आहेत. पण गोपिनाथ मुंगल यांने आपल्याजवळ ठेवलेली दुसरी पिस्टल व चार काडतुस अवधुत दासरवाड याने ती पिस्टल आणि चार जीवंत काढतुस पोलीसांसमक्ष हजर केले. ते पोलीसांनी जप्त केले आहेत. या दोन आरोपींविरुध्द भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या खोट्या गुन्ह्याला उघड करणारे पोलीस निरिक्षक श्री.द्वारकादासजी चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार पदमसिंह कांबळे, विलास कदम, मोतीराम पवार, महेश बडगु, राजु सिटीकर, गंगाधर घूगे, मारोती मुंडे, दादाराव श्रीरामे, हेमंत बिचकेवार यांचे कौतुक केले आहे. पोलीसांनी ही माहिती देतांना इतवारा पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा क्रमांक 12/2023 या बद्दल कायद्यात काय प्रक्रिया होईल याची माहिती मात्र दिलेली नाही.