नांदेड(प्रतिनिधी)-दोन जणांनी बिलोली-देगलूर रस्त्यावर खतगाव पाटीजवळ आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करून एका व्यक्तीकडून 40 हजार रुपयांचा ऐवज बळजबरी लुटला आहे.
मालु देवराव कांबळे हे 38 वर्षीय व्यक्ती दि.11 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता बिलोली-देगलूर रस्त्यावर देगलूरकडे जात असतांना खतगाव पाटीजवळ मुतण्याळ गावाजवळ त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी आम्ही पोलीस आहोत. लायसन्स दाखव म्हणून थांबवले आणि चाकुचा धाक दाखवून त्यांच्या बोटातील एक तोळे सोन्याच्या दोन अंगठ्या असा 40 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने नेला आहे. बिलोली पोलीसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 170 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 5/2023 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक ए.एन. नरुटे अधिक तपास करीत आहेत.
बिलोली देगलूर रस्त्यावर घडली लुट