11 पोलीस आयुक्तालय आणि दोन जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीसांना 25 कोटी 34 लाख 39 हजार रुपये गणवेश भत्ता मिळणार

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिकाऱ्यांना गणवेश भत्यात वाढ केल्याचा निर्णय मागील आठवड्यात झाला होता. या आठवड्यात सर्व पोलीस आयुक्तालय आणि दोन जिल्हे यातील 48 हजार 856 पोलीस कर्मचाऱ्यांना 5 हजार 167 रुपये गणवेश भत्ता देण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालक संजयकुमार वर्मा यांनी जारी केले आहेत.
अपर पोलीस महासंचालक संजयकुमार वर्मा यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेले हे पत्र 10 जानेवारी 2023 रोजीचे आहे. यामध्ये सन 2022-2023 या वर्षात पोलीस कर्मचाऱ्यांना गणवेश साहित्य देण्याऐवजी गणवेश भत्ता मंजुर करण्यात आला आहे. वित्तीय वर्ष 2022-2023 मध्ये राज्यातील पोलीस आयुक्त पुणे शहर, नागपूर शहर ठाणे शहर, नवी मुंबई, मिरा-भाईंदर-वसई-विरार, पिंपरी-चिंचवड, नाशिक शहर, औरंगाबाद शहर, सोलापूर शहर, अमरावती शहर, लोहमार्ग मुंबई आणि पोलीस अधिक्षक पालघर तथा पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण एवढ्या घटकात कार्यरत असलेल्या 48 हजार 856 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 5 हजार 167 रुपये असा एकूण 25 कोटी 24 लाख 38 हजार 952 रुपये गणवेश भत्ता वाटप करण्याचे आदेश आहेत. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. त्यातील मुंबई पोलीस आयुक्तालय आणि 34 जिल्हे वगळता हा गणवेश भत्ता वाटप करण्यात आलेला आहे. इतर जिल्ह्यांचा क्रमांक कधी लागेल याची पोलीस विभागात वाट पाहिली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *