राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि डॉ.अनिल काकोडकर यांची उपस्थिती

नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा नियमित पंचविसावा दीक्षान्त समारंभ आणि विशेष दीक्षान्त समारंभ दि. २४ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. यापूर्वी हा समारंभ१५जानेवारी रोजी संपन्न होणार होता. पण काही तांत्रिक अडचणीमुळे हा समारंभ २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. भगतसिंह कोश्यारी स्वतः या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. असे राजभवनातून कळविण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अनुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी डॉ. अनिल काकोडकर हे राहणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन यांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दीक्षान्त समारंभाची तयारी करण्यासाठी अनेक समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि त्याद्वारे कामाचा आढावा घेतला जात आहे.
तरी या दीक्षान्त समारंभाच्या तारखेत झालेल्या बदलाची नोंद सर्व संबंधितांनी घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी केले आहे.