स्थानिक गुन्हा शाखेचे हजेरी मेजर लई भारी; कार्यालयीन कामकाज करत-करत चोरटे पकडण्यात सहभागी

दोन चोरटे पकडले; 2 लाख 93 हजार 500 रुपयंाचा मुद्देमाल जप्त
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हा शाखेने उघड केला आहे. सोबतच भाग्यनगर येथील एक जबरी चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. चोरट्यांकडून चोरीचे 7 मोबाईल आणि दोन दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कार्यवाहीमध्ये स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरिक्षकांऐवढेच स्थानिक गुन्हा शाखेतील हजेरी मेजरचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यांनी आपले कार्यालयीन कामकाज यथायोग्य सांभाळून चोरट्यांना पकडण्यात सुध्दा सहभाग घेतला आहे.
पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांनी आपल्या पोलीस पथकासह जावून नावघाट, संतदासगणु पुलाजवळ शेख इमरान शेख अलीम (19) रा.नावघाट नांदेड आणि शेख शायद शेख यासिन (20) रा.गाडीपुरा नांदेड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात घडलेला जबरी चोरीचा गुन्हा क्रमांक 20/2023 आणि भाग्यनगर पोलीस ठाण्यात घडलेला गुन्हा क्रमांक 484/2022 उघडकीस आला. या चोरट्यांकडून चोरीचे सात मोबाईल, दोन दुचाकी गाड्या आणि एक खंजीर असा एकूण 2 लाख 93 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे यांनी ही कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार सखाराम नवघरे, गंगाधर कदम, बालाजी तेलंग, दिपक पवार, विठ्ठल शेळके, विलास कदम, गणेश धुमाळ, मारोती मोरे, महेश बडगु, राजू सिटीकर यांचे कौतुक केले आहे.
हजेरी मेजरचा जबरदस्त सहभाग
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या ऐवढेच आणि सर्वात महत्वपुर्ण योगदान या चोरट्यांना पकडण्यामध्ये स्थानिक गुन्हा शाखेचे हजेरी मेजर सखाराम नवघरे यांचे आहे. आपल्या कार्यालयातील कामकाज पार पाडता-पाडता त्यांनी पोलीस पथकासह बाहेर जावून मैदानात केलेल्या कामाची प्रशंसा केलीच पाहिजे. कार्यालयातील कामकाजात अत्यंत खारीचा वाटा उचलणाऱ्या सखाराम नवघरे यांनी बाहेर सुध्दा आपली किती वचक आहे हे दाखवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *