नांदेड(प्रतिनिधी)-आपल्यावरच गोळीबाराचे कुंभांड (कट)रचवणाऱ्या महिलेला प्रथमवर्ग वर्ग न्यायदंडाधिकारी सी.एस.जाधव यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.9 जानेवारी रोजी नांदेड शहरातील बाफना उड्डाणपुलावर सविता बाबुराव गायकवाड या 44 वर्षीय महिलेवर गोळीबार झाला. या बाबतची तक्रार देतांना सविता गायकवाड यांनी परभणी येथील रहिम खान नुरखान आणि त्याचा भाऊ जाफर अशा दोघांसह एक अनोळखी व्यक्तीने माझ्यावरील जिवघेणा हल्ला घडविला अशी तक्रार दिली. याबाबत इतवारा पोलीसांनी गुन्हा क्रमांक 12/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 34 नुसार दाखल केला. गोळीबाराची घटना दहशत माजविणारी होती म्हणून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या प्रकरणाला अत्यंत गांभीर्यपुर्वक घेतले आणि गोळीबाराच्या घटनेला 48 तास पुर्ण होण्याअगोदरच ते कुंभांड होते ही बाब जनतेसमोर आणली. स्वत: सविता बाबुराव गायकवाड यांनी हा गुन्हा मी दुश्मनी काढण्यातून घडविल्या असल्याची कबुली पण दिली.
आज उपचार घेणाऱ्या सविता गायकवाड यांना दवाखान्यातून सुट्टी मिळाल्यानंतर पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात सविता गायकवाडला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. पोलीस उपनिरिक्षक शेख असद, पोलीस अंमलदार गोविंद पवार, घुगे, शिंदे आणि महिला पोलीस अंमलदार घागरे यांनी अटक केलेल्या सविता गायकवाड यांना न्यायालयात हजर केले. याप्रकरणात आता भारतीय दंड संहितेचे कलम 120(ब) वाढविण्यात आले आहे. पोलीसांनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये सविता गायकवाड विरुध्द सन 2010 पासून दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांचा अभिलेख सादर केला. या कटाच्या तपासासाठी सविता गायकवाड यांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश पी.एस. जाधव यांनी सविता गायकवाडला दोन दिवस अर्थात 19 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या गुन्ह्यातील दोन फरार असलेल्या आरोपींना अद्याप अटक करणे बाकी आहे. तसेच सध्या तुरूंगात असलेला लहुजी गंगाधर दासरवाड हा हस्तांतरण करावा असा अर्ज पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांनी न्यायालयात दाखल केलेला आहे. या पुर्वीचा अटक आरोपी किरण सुरेश मोरे आजपासून तुरूंगात अर्थात न्यायालयीन कोठडीत गेला आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/01/10/मध्यरात्री-बाफना-पुलावर/