नांदेड,(प्रतिनिधी) -गायरान जमीन खरेदी विक्री करण्यासाठी शासनाच्या आदेशाची प्रत मिळणे बाबत महसूल सहायकाने मागितलेल्या बारा हजार रुपये लाच प्रकरणी महसूल सहाय्यक आणि एका खाजगी माणसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यातील एका तक्रारदाराने लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारी नुसार भोकर तहसील कार्यालयातील महसूल सहायकाकडे दीड महिन्यापूर्वी दिलेल्या अर्जावर कार्यवाही न झाल्या प्रकरणी पुन्हा एकदा अर्ज दिला. त्यानुसार गायरान पट्ट्याची परवानगी आदेश आणि त्याची नक्कल देण्यासाठी लोकसेवक असलेल्या महसूल सहायक सुभाष रघुनाथ कुंडलवार यांनी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली ही तक्रार 6 जानेवारी रोजी देण्यात आली होती. 11 जानेवारी रोजी या लाच मागणीची पडताळणी झाली. त्यात तडजोडीनंतर महसूल सहायकाने 12 हजार रुपयांची लाच मागितली.
यानंतर लाच मागणी करणारे महसूल सहाय्यक सुभाष रघुनाथ कुंडलवार (46) आणि खाजगी व्यक्ती दीपक चंद्रकांत घोगरे (51) या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणीसाठी ताब्यात घेतले आहे. वृत्तलेपर्यंत 12 हजार रुपये लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
लासलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे, पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम यांनी आणि पोलिस अंमलदार संतोष वच्छेवार, गणेश तालकोकुलवार,ईश्वर जाधव, प्रकाश मामुलवार, गजानन राऊत, निळकंठ यमुलवाड यांनी ही कार्यवाही पूर्ण केली.
लाच मागणीच्या या गुन्ह्याची माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने कोणी खाजगी व्यक्तीने शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य बक्षीस आणि लाचेची मागणी केली असेल तर त्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती द्यावी. पोलीस अधीक्षक डाॅ. राजकुमार शिंदे यांचा मोबाईल क्रमांक 96 23 99 99 44 आणि पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील यांचा मोबाईल क्रमांक 73 50 19 71 97 तसेच कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0 22 62 25 35 12 तसेच टोल फ्री क्रमांक 10 64 या क्रमांकावर सुद्धा भ्रष्टाचाराची माहिती देता येईल. या प्रकरणातील महसूल सहाय्यक सुभाष रघुनाथ कोंडलवार आणि दीपक चंद्रकांत घोगरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.ं