नांदेड जिल्ह्यातून तीन पुरूष दोन महिलांनी घातली न्यायाधीश पदाला गवसणी

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग यासाठी झालेल्या परिक्षेतून 63 जणांची निवड झाली आहे. त्यात नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय नांदेड येथून विधी पदवी प्राप्त करणारे तीन युवक आणि दोन युवती आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 63 प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पदासाठी जाहीरात दिली होती. त्या परिक्षेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुणवत्ता यादीनुसार 63 जणांची शिफारस केली आहे. त्यातील 5 जण नांदेड येथील आहेत. नांदेड येथून गुणवत्ता यादीत सातव्या क्रमांकावर आलेले ऍड.शिवराज पाटील, गुणवत्ता यादीतील 15 व्या क्रमांकावरील ऍड. मोहन कुरे, 21 व्या क्रमांकावर ऍड.अश्विनी ढवळे, 31 व्या क्रमांकावर ऍड.सागर पाटील आणि 52 व्या क्रमांकावर सायमा निखत यांचा क्रमांक आहे. हे सर्व युवक आणि युवती नांदेड येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत. यातील सागर पाटील यांचे यश सर्वात महत्वपूर्ण यासाठी आहे की, शेवटच्या चौथ्या संधीमध्ये त्यांना यश प्राप्त झाले. या अगोदर ते तीन वेळेस गुणवत्ता यादीप्रमाणे मुलाखत या पायरीपर्यंत गेले होते पण त्यावेळेस त्यांना यश आले नाही.
नांदेड येथील अभिवक्ता संघटनेचे अध्यक्ष ऍड.सतिश पुंड यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी, वकीलांनी, कॉलेज प्रशासनाने, प्राध्यापकांनी, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी न्यायाधीश पदी निवड झालेल्या सर्वांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *