बेटी बचाव- बेटी पढाओसाठी जिल्हा परिषदेत शपथ

18 ते 24 जानेवारी दरम्यान जिल्‍हयात जनजागृती सप्ताह

 नांदेड(प्रतिनिधी)- बेटी बचाव-बटी पढाओ ही केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना असून सदर योजनेचा मूळ उद्देश लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलीच्या शिक्षणाबाबत आणि मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षितेबद्दल खात्री देणे आहे. सदर योजना जनमानसात रुजवण्यासाठी योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येतात. दिनांक 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या औचित्यने बेटी बचाव-बेटी पढाओसाठी दिनांक 18जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत विशेष जनजागृती सप्ताह राबवला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.

या आज जिल्हा परिषदेत बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकरकर, उपमुख्‍य लेखा व वित्त अधिकारी शेखर कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना सीईओ ठाकूर यांनी बेटी बचाव-बेटी पढाओची शपथ दिली.

दिनांक 19 जानेवारी रोजी अंगणवाडी केंद्राच्या मदतीसाठी दानशूर व्यक्ती, संस्था यांना आवाहन करणे, बाल संरक्षण तसेच मुलींच्या कौशल्य विकासाचे महत्त्व या विषयावर महिलांच्‍या कॉर्नर बैठका, बेटी बचाव-बेटी पढाओ योजनेच्या संदेशाचे स्टिकर्स चिटकवणे, दिनांक  20 जानेवारी रोजी खाजगी व जिल्हा परिषदेच्या शाळांमधून मुलींच्या विविध क्रीडा स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. तसेच सामाजिक चळवळीसाठी योजनेचे पोस्टर, घोषवाक्य, चित्रकला व विविध स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. दिनांक 23 जानेवारी रोजी धार्मिक गुरु, सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींच्‍या सहभागाने बेटी बचाव-बेटी पढाओ योजनेची जनगृती केली जाणार आहे. बाल विवाह निर्मूलन, आरोग्‍य व पोषण व  महिलांचे कायदे या विषयी  माहिती देण्‍यात येणार आहे. याशिवाय वाद-विवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा व स्टॉकशोचेही आयोजन केले जाणार आहे. दिनांक 24 जानेवारी रोजी सप्ताहाचा समारोप होणारा असून 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन असून या दिवशी जिल्‍हयातील सर्व गावातून बेटी बचाव-बेटी पढाओची शपथ घेतली जाणार आहे. महिला व बाल विकास विभागाच्‍या वतीने या जनजागृती सप्‍तहाचे अयोजन करण्‍यात आले आहे.

सर्व खाते प्रमुख, गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी, तालुका आरोग्‍य अधिकारी यांनी पुढाकार घेवून हा सप्‍ताह यशस्‍वी करावा असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *