नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर तालुक्यातील आंतापूर आणि खानापूर येथे दोन आणि भोकर येथे एक अशा तीन घरफोड्यांचे गुन्हे पोलीस दप्तरी नोंद झाले आहेत. त्यामध्ये जवळपास 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
व्यंकट निवृत्त माने आणि त्यांच्या शेजारच्या घरात चोरट्यांनी 17 जानेवारीच्या रात्री 9 ते 18 जानेवारीच्या रात्री 2 वाजेदरम्यान डल्ला मारला. दोन्ही घरांचे कुलूप तोडून त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 15 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक मुंडे अधिक तपास करीत आहेत.
देगलूर तालुक्यातील खानापूर येथे असलेले श्रीगणेश कृषीसेवा केंद्र आणि त्यांच्या शेजारचे दुकान फोडून चोरट्यांनी त्यातून 36 हजार 800 रुपये किंमतीचे दुकानातील साहित्य चोरून नेले आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक मुंडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
यश राहुल रावळे यांच्या समतानगर भोकर येथील घरातून 17 जानेवारीच्या दुपारी 12 ते 18 जानेवारीच्या रात्री 2 वाजेदरम्यान त्यांचा 12 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला केला आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार मुधोळे अधिक तपास करीत आहेत.
देगलूरमध्ये चार चोऱ्या, भोकरमध्ये एक चोरी ; 1 लाख 70 हजारांचा ऐवज लंपास