नांदेड(प्रतिनिधी)-हरविंदरसिंघ उर्फ रिंदा हा मरण पावला नसून जीवंत आहे. मी महाराष्ट्रात 15 वर्षाचा असतांना नांदेड स्थानिक गुन्हा शाखेत माझ्यावर झालेल्या अन्यायानंतर मी गुन्हेगारीकडे वळलो असे सांगतांना हरविंदरसिंघ देशात सुरू असणाऱ्या राजकीय व प्रशासनिक लोकांवर आपला रोष व्यक्त करत होता. एबीपी सांझा या वृत्तवाहिनीला 19 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता त्याने लाईव्ह मुलाखत दिली. वृत्तवाहिनीचे संपादक जसविंदर पटीयाल यांनी ही मुलाखत घेतली आहे.
मी 15 वर्षाचा असतांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत मला नांदेडच्या एका पोलीसाने नेले त्याचे कारण मी माझ्या एका समवयस्क युवकासोबत असलेली मैत्री संपवावी असे मला स्थानिक गुन्हा शाखेत नेणाऱ्या पोलीसाने सांगितले. त्या ठिकाणी मला तुझ्यावर चोरीचे जास्त-जास्त गुन्हे टाकेल अशी धमकीपण दिली. त्या दिवशी माझी परिक्षा होती. मला परिक्षेला जायला उशीर झाला आणि त्या घटनेनंतर माझे मन गुन्हेगारी जगताकडे वळाले. मी अतिरेकी तुरूंगातून बनलो. याबद्दल सांगतांना रिंदाने आपल्या सोबत झालेल्या अनेक घटनांचा उल्लेख या मुलाखतीमध्ये केला. ही मुलाखत जवळपास एक तास चालली होती. वास्तव न्युज लाईव्हने आज या मुलाखतीला ऐकले तेंव्हा जवळपास 15 लाख लोकांनी या मुलाखतीला 24 तास पुर्ण होण्याअगोदर पर्यंत ऐकलेले आहे.
सांझाचे संपादक जसविंदर पटीयाल यांनी रिंदाला विचारले तु पाकिस्तानमध्ये राहुन आयएसआयच्या हाताने कटपुतलीसारखा वागतो आहेस ते सोडून परत भारतात ये तेंव्हा रिंदा मात्र मी पाकिस्तानमध्ये आहे हेही मान्य करत नाही आणि पाकिस्तानची आयएसआय माझी सुरक्षा रक्षक आहे हेही मान्य करत नाही. जसविंदर पटीयाल त्याला विचारतात की, गुरू महाराजांनी सांगितलेल्या नियमानुसार तु का वागत नाहीस तर रिंदा म्हणतो मी अन्यायाविरुध्द वागतो आणि आजपर्यंत मी जवळपास 100 कोटी रुपयंाची खंडणी वसुल केली आहे. त्यावर त्या खंडणीचा उपयोग जसविंदर पटीयाल त्याला विचारतात तेंव्हा तो सांगतो की, ते पैसे मी कोणाला तरी दिले असणारच. पण त्यांचे नाव सांगितले तर पोलीस विभाग त्यांना आतमध्ये टाकेल. मी भारतीय सिस्टीमविरुध्द लढतो आहे. यावर जसविंदर पटीयाल सांगतात की, सिस्टीम बदलण्यासाठी तु निवडणुक लढव आणि सिस्टीमच बदलून टाक मी तुझ्या सोबत आहे पण यावर रिंदाकडे काही उत्तर नाही.
तुझ्या मृत्यूची खोटी बातमी कशी पसरली याचे स्पष्टीकरण देतांना रिंदा सांगतो की, हॉंकॉंगमध्ये राहणाऱ्या एका महिला वकीलाने शासकीय यंत्रणांकडून 50 लाख रुपये घेवून माझ्या मृत्यूची खोटी बातमी प्रसारीत केली. मी पाकिस्तानात आहे असा तुमचा समज का आहे असा प्रतिप्रश्न हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संपादक पटीयाल यांना विचारतो. यावर संपादक सांगतात मी तुझ्यावर विश्वास करेल फक्त तु तुझ्या हृदयावर हात ठेवून सांग की मी पाकिस्तानमध्ये नाही यावर रिंदाने काही उत्तर दिले नाही.
अनेक अतिरेक्यांशी, गुन्हेगारांशी ओळख आहे, माझे त्यांच्याशी बोलणे होत राहते, मी पुढे सुध्दा अन्यायाविरुध्द, चुकीच्या सिस्टीमविरुध्द सुरू केलेला लढा सुरूच ठेवणार आहे. यावर पटीयाल रिंदाला सांगतात की, तुझ्या पध्दतीने कधीच क्रांती घडू शकत नाही किंवा त्यातून विजय मिळू शकत नाही. अशा प्रकारे अतिरेकी सज्ञेत नाव असणाऱ्या हरविंदरसिंघ उर्फ रिंदाची मुलाखत प्रसारीत होवून 19 तास झाले आहेत आणि 19 तासांमध्ये तर तासाला एक लाखांपेक्षा लोक त्याची ही मुलाखत पाहत आहेत.
आज हरविंदरसिंघ उर्फ रिंदा कोठेही असेल, त्याचे आरोप काहीही असतील पण मुलाखत घेणारे संपादक जसविंदर पटीयाल यांनी सांगितलेली बाब सत्य आहे ती अशी की, रिंदाच्या विचारसरणीवर चालून क्रांती येत नसते. तो कोठे तरी बाहेर आहे तो स्थानिक युवकांना कामाला लावतो आणि ते युवक नंतर मकोकासारख्या गुन्ह्यात अडकतात. त्यांच्या कुटूंबियांना पोलीस विभाग आणि न्यायालय यात चकरा-मारतात, मारता त्यांचे पायताण तुटतात याचा जबाबदार कोण याचा विचार स्थानिक युवकांनी करण्याची गरज आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील माझ्यासोबत घडलेल्याप्रसंगानंतरच मी गुन्हेगारीकडे वळलो-इति.हरविंदरसिंघ उर्फ रिंदा; एबीपी सांझाची मुलाखत लाखो लोक पाहत आहेत