नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने एका युवकाकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जीवंत काडतुसे पकडली आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक आर.सी.वाघ यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाला जनता कॉलनी भागात पाठविले. पोलीस निरिक्षकांच्या सांगितलेल्या वर्णनाचा युवक गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतला. त्याचे नाव उत्कृश प्रमोद सुर्यवंशी असे आहे. त्याची तपासणी केली असता त्याच्या कंबरेला एक गावठी पिस्टल लावलेल होते. त्यात सोबत पोलीस पथकाला दोन जीवंत काडतुसे सापडली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या युवकाविरुध्द गुन्हा क्रमांक 16/2023 भारतीय हत्यार कायद्याच्या कलम दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, खंडेराव धरणे, पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख, पोलीस निरिक्षक आर.सी.वाघ, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आदींनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, दिलीप राठोड, रविशंकर बामणे, देविसिंग सिंगल, शेख अजहर, दत्ता वडजे आदींचे कौतुक केले आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने गावठी पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसे पकडली