नांदेड(प्रतिनिधी)-मोबाईल चोरी करणाऱ्या एका 20 वर्षीय चोरट्याला पकडून नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने त्याच्याकडून चोरी केलेले 2 लाख 70 हजार रुपये किंमतीचे 15 मोबाईल जप्त केले आहेत. या चोरट्याला पुढील तपासासाठी पोलीस ठाणे विमानतळच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आज दि.21 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हा शाखेला प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी ग्यानमाता शाळेजवळच्या रस्त्यावर शेख सरवर शेख आयर (20) रा.गाडीपुरा यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने आणि इतर तिन साथीदारांनी मिळून अनेक मोबाईल चोरी केले असल्याची माहिती पोलीसांना सांगितली. त्यानंतर पोलीसांनी त्याच्याकडून 15 मोबाईल जप्त केले. त्या मोबाईलची एकूण किंमत 2 लाख 70 हजार रुपये असल्याची माहिती पोलीसांनी सांगितली आहे. पकडलेल्या शेख सरवर शेख आयरला पुढील तपासासाठी विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 336/2022 च्या संदर्भाने त्यांचा ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्हेगाराकडून अनेक गुन्हे अजून उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, जी.पोलीस उपनिरिक्षक श्री.गोविंदरावजी मुंडे साहेब, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, दिपक पवार, विठ्ठल शेळके, विलास कदम, गणेश धुमाळ, महेश बडगु, सायबर टिमचे राजू सिटीकर आणि दिपक ओढणे यांचे कौतुक केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने एका मोबाईल चोरट्याकडून 2 लाख 70 हजार रुपये किंमतीचे 15 मोबाईल पकडले