नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 21 जानेवारी रोजी सायंकाळी अमिर खान दिलावर खानवर माणिक पेट्रोल पंपच्या कॅबीनमध्ये जिवघेणा हल्ला झाला. त्यातील एका गुन्हेगाराला विमानतळ पोलीसांनी आज अटक केली आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्यानमाता शाळेजवळील एका हॉटेल मालकाला जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन जण खंजीर घेवून धावले. आपला जीव वाचविण्यासाठी अमिर खान दिलावर खान कर्मवीरनगरमधील माणिक पेट्रोल पंपाच्या कॅबीनमध्ये घुसले. तेथे सुध्दा हल्लेखोरांनी त्यांच्यावर खंजीरच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी विमातनळ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 504 नुसार गुन्हा क्रमांक 27/2023 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास विमानतळ येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक अनलदास यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर विमानतळ पोलीसांनी त्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज आदींची तपासणी करून हल्लेखोरांमधील एक गिरीश सखाराम भटगळ (19) रा.कर्मवीरनगर नांदेड यास अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. पकडलेला एका हल्लेखोराला उद्या न्यायालयात घेवून जाणार आहेत अशी माहिती पोलीसांनी दिली. या प्रकरणातील आणखी एक आरोपी पोलीसांना शोधायचा आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/01/22/अमिर-खानवर-चाकु-हल्ला-रस्/