बनावट अकृषीक आदेशाचा वापर ग्रामीण भागात सुरू

नांदेड(प्रतिनिधी)-अ कृषीक आदेश बनावट पध्दतीने तयार करून तो आदेश खरा असे भासवून ग्राम पंचायत कार्यालय सारखणी येथे दाखल करणाऱ्या अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा प्राथमिक चौकशी करून दाखल झाला आहे.
तलाठी सज्जा दहेली ता.किनवट येथील तलाठी प्रदीप जांबुवंतराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सारखळणी येथे शेत सर्व्हे नंबर 167 मधील मालक सपना अरुण राठोड रा.पलाईगुड्डा यांच्या 1.44 हेक्टर शेतीचा कोणी तरी अज्ञात व्यक्तीने बनावट अकृषीक आदेश क्रमांक तयार केला. या आदेशावर 1 नोव्हेंबर 2003 ही तारीख आहे. तो या शेतामध्ये भुखंड क्रमांक 1 नुसार मालमत्ता क्रमांक 279 वर नोंद घेण्यात आला. हा खोटा आदेश समजल्यानंतर प्रदीप कदम यांनी ही तक्रार दिली या तक्रारीअगोदर या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. सिंदखेड पेालीसांनी या प्रकरणी फसवणूक सदरात गुन्हा क्रमांक 5/2023 दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *