नांदेड(प्रतिनिधी)-बीट क्वॉईन स्टॉक खेळल्यानंतर भरलेल्या रक्कमेपेक्षा 20 टक्के जादा रक्कम त्वरीतप्रभावाने मिळते असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 44 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे.
निलेश गंगाधरराव सांगवीकर रा.भवितव्यनगर, मालेगाव रोड नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.12 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान मोबाईल क्रमांक 8007637548 वरून त्यांच्या मोबाईल क्रमांक 8861173638 च्या व्हॉटसऍपवर पार्टटाईम नोकरी करता काय? असे संदेश पाठवून निलेश सांगवीकर यांची संपूर्ण माहिती घेतली. तसेच टेलीग्रॉफवर बिट क्वॉईन स्टॉक स्टॉक खेळल्यास बॅंकेत भरलेल्या रक्कमेपैकी 20 टक्के रक्कम जास्त मिळेल असे आमिष दाखवले. बीट क्वॉईन स्टॉक खेळता-खेळता त्या अज्ञात ठकसेनाने निलेश सांगवीकर यांना 43 लाख 98 हजार 448 रुपये बॅंकेत भरून हस्तांतरण करायला लावले. आपली फसवणूक झाली असे कळल्यानंतर निलेश सांगवीकर यांनी तक्रार दिली. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 39/2023 दाखल केला आहे. यात भारतीय दंड संहितेचे कलम 420 सह तंत्रज्ञान कायदा कलम 66(ड) जोडले आहेत. या गुन्ह्याचा तपास भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
बीट क्वाईन स्टॉक खेळता-खेळता ठकसेनाने लुटले 44 लाख रुपये