नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षकांच्या धर्मपत्नी पोलीस नसतांना सुध्दा आपले पती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासोबत काम करणाऱ्या पोलीसांच्या पत्नी आणि महिला पोलीसांसोबत 26 जानेवारी आणि मकरसंक्रांत असा दुहेरी संगम साधून एक स्नेह मेळावा सादर केला.

पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या धर्मपत्नी सौ.स्नेहल कोकाटे यांनी 26 जानेवारी आणि मकरसंक्रांत असा दुहेरी संगम आयोजित करून स्नेहनगर पोलीस वसाहत येथे एक स्नेह मेळावा आयोजित केला होता. महिलांमध्ये संक्रांत हा सण वाण देवाण-घेवाण या पध्दतीने साजरा होतो. या स्नेह मेळाव्यात वाणांची देवाण-घेवाण पण झाली. सोबतच पोलीस वसाहतीमधील महिलांसाठी हळदी-कुंकू, रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, पाककला स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यांना बक्षीसे देण्यात आली. या कार्यक्रमात अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि बालक-बालिका, महिला पोलीस अंमलदार आणि अनेक पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात सौ.स्नेहल कोकाटे, सौ.राऊत, सौ.अंजली मोरे, सौ.किरण भोरे यांनी उपस्थितांमधील विजेत्यांना बक्षीसे दिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीमती कलेटवाड, कमल शिंदे, पोलीस उपनिरिक्षक स्नेहा पिंपरखेडे, बाभळे, प्रियंका आगाव, महिला पोलीस अंमलदार संगीता श्रीमंगले, सुप्रिया टोम्पे, शामका पवार, सुजाता कांबळे, मनिषा तोटेवाड, सिमा जोंधळे, कांचन शिंदे, शेख शमा, रुक्मीन कानगुले, सुजाता टाकळीकर, गिता कांबळे, तेलंग उर्फ काळे, सुजाता आळंदीकर, दिपीका देशमुख, शुभांगी जाधव, क्रांती बंदखडके, माया गायकवाड, गोदावरी कुंडगिरी, लोपामुद्रा आणेराव यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल कत्ते यांनी केले.
