1 फेबु्रवारी रोजी होणार कार्यक्रम; स्वागताध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची माहिती
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेडसह आसपासच्या जिल्ह्यातील नागरीकांना धर्मनिरपेक्ष, तणावमुक्त, हिंसामुक्त असा सुदृढ समाज निर्माण कसा होईल ज्यामुळे भारतासह जगात शांतता नांदेल याचे मार्गदर्शन करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री.श्री.रविशंकरजी यांच्यासोबत 1 फेबु्रवारी रोजी सायंकाळी मामा चौक कौठा येथे सत्संग गुरूवाणी या सभेचे आयोजन करण्यात आले असून जनतेने जास्तीत जास्त संख्येत या सत्संगाचा उपयोग घ्यावा असे आवाहन या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहनराव हंबर्डे, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत,माजी आ.वसंत चव्हाण, ओमप्रकाश पोकर्णा, माजी महापौर जयश्री पावडे, नंदकिशोर आवटी, मकरंद जाधव, अंजली विजापुरे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना अशोकराव चव्हाण म्हणाले की, परम पूज्य गुरूदेव श्री.श्री.रविशंकरजी हे दि.1 फेबु्रवारी रोजी नांदेड येथे येतील तसेच सायंकाळी 6 वाजता मामा चौक येथे त्यांच्या महासत्संग गुरुवाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात किमान एक ते दिड लाख भाविक उपस्थित राहणार असून ते विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. जसे जीवन म्हणजे काय, जीवन कसे जगले पाहिजे अशा अनेक विषयांवर ते प्रवचन देणार आहेत. त्यांनी आता पर्यंत 180 देशात प्रवचन केली आहेत. त्यांच्या कार्यात नेहमीच धर्मनिरपेक्षता आणि जगात शांतता नांदावी असे कार्य त्यांनी केले आहेत. या महासत्संग गुरुवाणी या कार्यक्रमासाठी व्यापारी संघटनेच्यावतीने दुपारी 3नंतर दुकाने बंद ठेवण्याचे ठरविले आहे. परम पूज्य गुरूदेव श्री.श्री.रविशंकरजी हे सचखंड श्री.हजुर साहिब येथे दर्शनास जाणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी शहरात परम पूज्य गुरूदेव श्री.श्री.रविशंकरजी यांचे अनेक बॅनर लावण्यात आले होते परंतू आजघडीला भरपूर कमी बॅनर दिसत आहेत यावरुन जनतेत भ्रम निर्माण झाला आहे अशा प्रश्नाला उत्तर देतांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हण म्हणाले की, नांदेड महानगरपालिकेत आता प्रशासक राज्य आहे. बॅनर कोणी काढले व का काढले याबद्दल अजून तरी काही माहिती आम्हाला नाही. भाविकांची येण्या-जाण्याची सोय कशी केली आहे अशा प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले की, राजकीय सभेला लोक आणावे लागतात परंतू धार्मिक कार्यक्रमांसाठी लोक आणवे लागत नसल्याची कबुलीही अशोकराव चव्हाण यांनी दिली. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत येणार असल्याची चर्चा आहे अशा प्रश्नाला उत्तर देतांना चव्हाण म्हणाले की, शिवसेनेशी त्यारंची युती झाली आहे. पण अद्याप कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा झालेली नाही पण आले तर स्वागत आहे. परंतू वर्ष-वर्ष, दोन-दोन जर निवडणुका होत नसतील तर ते दुर्देव आहे. लोकशाही प्रबळ राहण्यासाठी निवडणुका झाल्या पाहिजेत.बाभळीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही तो अर्धवटच आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणारच आहे.भारत जोडो यात्रेसंदर्भाने बोलतांना अशोकराव चव्हाण म्हणाले की, श्री.श्री.रविशंकरजी यांची जी शिकवण आहे तीच राहुल गांधी यांच्या प्रयत्नातून साध्य होत असेल तर काय हरकत आहे.भारत जोडा यात्रा ही देशात एकोप्याचे वातावरण निर्माण व्हावे, लोकांमध्ये आदराची आणि प्रेमाची भावना निर्माण व्हावी या सुत हेतूने ही 4 हजार किलो मिटरची यात्रा काढली. त्यांची यात्रा देश जोडण्यासाठी होती आणि प्रेमाचे आनंदाचे वातावरण निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. सिमावृत्ती भागांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, सिमावृत्ती भागात मी फिरलो आहे त्यामुळेच मी देगलूर मतदार संघासाठी 180 कोटी रुपये दिले होते परंतू ते आज रोखून ठेवले आहेत ते चुकीचे आहे असेही माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले.
धर्मनिरपेक्ष, हिंसामुक्त, सुदृढ समाज कसा निर्माण करावा याचे मार्गदर्शन करणार श्री.श्री.रविशंकरजी