नांदेड(प्रतिनिधी)-नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगांच्या परिक्षांमधून आसरानगर येथील सायमा निखत शेख अब्दुल सत्तार यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी या पदावर आपले नाव नोंदवले आहे.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमध्ये नांदेड येथून 7 जणंाची निवड झाली होती. महाराष्ट्रातून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदासाठी 63 जणांची निवड झाली आहे. नांदेड येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयातून विधी शाखेचे शिक्षण पुर्ण करणाऱ्या सायमा निखत शेख अब्दुल सत्तार यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. त्यांनी अगोदर आयटी शाखेतून आपला अभ्यास अभियंता पदव्युत्तर पर्यंत पुर्ण केला आणि नंतर विधी शाखेची पदवी घेतली. त्यांचे प्राथमिक शिक्षण युसूफिया हायस्कुल येथून पुर्ण झाले आहे.
सायमा निखत यांचे वडील हे बिलोली न्यायालयात बेलीफ या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे आई-वडील, नातलग, शिक्षक, इतर मित्र परिवार यांच्याकडून कौतुक होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस सर्वांनी शुभकामना दिल्या आहेत.
बेलीफ असलेल्या पित्याची मुलगी झाली न्यायाधीश