नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय प्रजासत्ताक दिनापासून चार दिवस चाललेल्या दुसऱ्या आंतरशालेय 13 वर्ष वयोगटातील साखळी बास्केट बॉल स्पर्धेत 16 संघ सहभागी झाले होते. ज्यामध्ये 10 संघ मुलांचे आणि 6 संघ मुलींचे होते. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून या स्पर्धेत मुलांमध्ये अजिंक्य जयपाल गजभारे आणि मुलींमध्ये सौंदर्या भालेराव यांची निवड झाली.
प्रजासत्ताक दिनापासून चार दिवस मनपा शाळा क्रमांक 10 डॉ.आंबेडकरनगर येथील मैदानात या बास्केट बॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये एकूण 16 संघांनी सहभाग घेतला होता. त्यात 10 संघ मुलांचे आणि 6 संघ मुलींचे होते. या स्पर्धांमध्ये मुलांच्या संघांपैकी पुर्णा येथील संघाने प्रथम क्रमांक पटकावल, व्होरायझन शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर ऍकॅडमीच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. मुलींच्या संघांमध्ये प्रथम क्रमांक मनपा शाळा विष्णुनगर, द्वितीय क्रमांकावर होरायझन आणि तृतीय क्रमंाकावर स्टेडीयम ऍकॅडमी यांनी बक्षीसे प्राप्त केले. या स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अजिंक्य जयपाल गजभारे आणि सौंदर्या भालेराव यांची निवड झाली.
या स्पर्धेच्या बक्षीस समारंभात नांदेड जिल्हा बॉस्केट बॉल संघटनेचे उपाध्यक्ष सुहास कांबळे, आंतरराष्ट्रीय फुटबॉल पटू आणि महाराष्ट्राच्या बॉस्केट बॉल संघात व्यवस्थापक म्हणून निवड झालेले साजीद अन्सारी, आशिष रेणापुरकर, अजिंक्य रावळकर, शेख रंजू, संजय जाधव या खेळाडूंची उपस्थिती होती. विद्यार्थी-विद्यार्थींनीच्या पालकांमध्ये रितेश पाडमुख, मुंडे यांची उपस्थिती होती. या स्पर्धेच्या बक्षीसांचे प्रायोजकत्व बाबासाहेब शंकरराव शिंदे यांनी कै. शंकरराव शिंदे यांच्या स्मृतीत स्विकारले होते. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोहन सोनकांबळे,विकास मेहरकर, शेख इमरान, नागसेन, बस्वराज, राजेश, मोहम्मद अन्वर, साक्षी, टिना, किर्ती, पल्लवी, सांची अर्जुन यादव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार जयपाल गजभारे यांनी केले.
13 वर्षीय बास्केटबॉल स्पर्धांमध्ये अजिंक्य गजभारे आणि सौंदर्या भालेराव हे सर्वोत्कृष्ट खेळाडू