नांदेड(प्रतिनिधी)-टिळकनगर भागात एका विद्यार्थीनीचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला आहे. तिरुपतीनगर धनेगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी ऐवज लांबवला आहे. छत्रपतीनगर भागातून एक लॅपटॉप चोरीला गेला आहे, कावलगाव ता. देगलूर येथून सिंचनाचे साहित्य चोरीला गेले आहेत या सर्व घटनांमध्ये 2 लाख 18 हजार 999 रुपयांचा ऐवज लंपास झालेला आहे.
शाळेत शिकणारी एक 16 वर्षीय विद्यार्थीनी टिळकनगर भागातून विद्याविकास शाळेकडे जात असतांना दि.1 फेबु्रवारी 2023 रोजी सकाळी 6.30 वाजता दोन जण तिच्या पाठीमागून दुचाकीवर आले आणि तिच्या हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून नेला आहे. विमातळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक बुरकुले यांच्याकडे हा तपास देण्यात आला आहे.
राम मारोती ईबितदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 जानेवारीच्या दुपारी 3 ते 31 जानेवारीच्या सायंकाळी 7 .30 वाजेदरम्यान तिरुपतीनगर येथील आपल्या घराला कुलूप लावून ते मुखेड येथे गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांचे घर फोडले आणि त्यंाच्या घरातून लहान मुलांच्या सोन्याच्या पाच अंगठ्या आणि एक एलईडी टीव्ही असा 40 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पवार अधिक तपास करीत आहेत.
छत्रपतीनगर येथील शिवाणी सुभाष देशमुख या युवतीचा आपल्या घरातील खिडकीजवळ ठेवलेला 75 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप संगणक 2 जानेवारीच्या मध्यरात्री 1.30 वाजता कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार डाकोरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
कावलगाव ता.देगलूर येथील नागनाथ गोविंदराव वाडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 जानेवारीच्या सायंकाळी 6 ते 1 फेबु्रवारीच्या सकाळी 8 वाजेदरम्यान त्यांच्या कावलगाव शिवारातील शेतातून सिंचनाचे साहित्य आणि सोलार एनर्जीचे साहित्य कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेले आहे. या सर्व ऐवजाची किंमत 85 हजार रुपये आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार पल्लेवाड करीत आहेत.
विविध चोरीच्या घटनांमध्ये 2 लाख 18 हजारांचा ऐवज लंपास