नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेचे अत्यंत कर्तदव्यदक्ष पोलीस निरिक्षक द्वारकादासजी चिखलीकर साहेब यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हा शाखेने 19 वर्षीय युवकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तुल आणि तीन जीवंत काढतुसे सापडली आहेत.
आज 3 फेबु्रवारी रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे रेकॉर्डब्रेककडे वाटचाल करणारे पोलीस निरिक्षक श्री.द्वारकादासजी चिखलीकर यांना एक गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या विभागातील सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे यांना माळटेकडी पुजाच्या जवळ पाठविले. त्या ठिकाणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने आरेफ अन्वर शेख (19) रा.मेनकुदळे गल्ली अहमदपुर जि.लातूर ज्याचा धंदा बेकार आहे अशा युवकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक देशी बनावटीची पिस्तुल आणि तीन जीवंत काडतुसे सापडली आहेत. ज्याची किंमत 36 हजार 800 रुपये आहे. स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने यांनी पोलीस ठाणे विमानतळ येथे आरेफ अनवर शेख विरुध्द भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे तक्रार दिली आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादासजी चिखलीकर, सहाय्यक पेालीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार देविदास चव्हाण, मोतीराम पवार, रणधिर राजबन्सी, महेश बडगु आणि हेमंत बिचकेवार यांचे कौतुक केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने एक गावठी पिस्तुल आणि तीन जीवंत काडतुसे पकडली