नांदेड(प्रतिनिधी)-ऑनलाईन पध्दतीने एका व्यापाऱ्याला पुणे येथून जुने जनरेटर 6 लाख रुपयांना देतो अशी गळ घालून 6 लाख रुपये पाठविल्यानंतर जवळपास 3 महिने होत आले तरी जनरेट आले नाही म्हणून पुण्यातील व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय आनंदराव देशमुख रा.जंगमवाडी रोड नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.11 नोव्हेंबर 2022 रोजी आणि 25 जानेवारी 2023 रोजी त्यांच्या मोबाईलवरील व्हाटसऍपवर शामकुमार जोशी जनरेटर सेल्स ऑफीस साठे वस्ती, लोहगाव पुणे याने आपले व्हिजीटींग कार्ड पाठविले. तुम्हाला जनरेटर हवे असेल तर माझ्याशी संपर्क करा असा संदेश लिहिला. 625 केव्हीएचे जनरेटर 12 लाख रुपये किंमतीचे आहे पण जुने असल्यामुळे ते तुम्हाला 6 लाख रुपयांना देतो. तेंव्हा आपल्या माणसासोबत अजय देशमुख यांनी 6 लाख रुपये पाठविले. परंतू अद्याप जनरेट पाठविले नाही. भाग्यनगर पोलीसांनी या तक्रारीनुसार शामकुमार जोशी विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406 नुसार गुन्हा क्रमांक 49/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक वाठोरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
व्हाटसऍपवर संदेश पाठवून 6 लाख रुपयांची फसवणूक