नांदेड(प्रतिनिधी)-भारतात भरपुर संपत्ती आहे परंतू नेत्यांची मानसिकता कमजोर असल्यामुळे जनेतेला नेहमीच वंचित राहावे लागते. आज मेक इन इंडियाचा ज्योक इन इंडिया झाला आहे असे सांगत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव(केसीआर) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजावर कटाक्ष केला.
आज केसीआर यांनी नांदेडमध्ये बीआरएस पक्षाची सभा घेतली. सर्वप्रथम अनेक जणांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. त्यांना गुलाबी रंगाचा रुमाल गळ्यात घालून केसीआर यांनी त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. आपल्या भाषणाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले अशा महान व्यक्तींना जन्म देणाऱ्या महाराष्ट्राच्या भुमिला मी नमन करतो अशी केली. आज मी आपल्याला सांगणार आहे त्याबाबी येथेच सोडून जावू नका. घरी, गावात, मित्रांसोबत चर्चा करा मग त्यातून तुम्हाला काय पटले तो निर्णय घ्या असे केसीआर म्हणाले.
देशामध्ये असलेल्या परिस्थितीअनुरूप बीआरएस पार्टीने कांही दिवसांपुर्वीच जन्म घेतला. पुर्वी या पार्टीचे नाव टीआरएस असे होते. मी मागील 50 वर्षापासून राजकीय जीवनात आहे. माझ्या जीवनातील आधारावर हा निर्णय घेतला आणि बीआरएसच्या प्रसाराची सुरूवात नांदेडपासून केली आहे. आपण सर्वांनी मला प्रतिसद द्यावा जेणे करून देशात असलेल्या परिस्थितीला अनुरूप आणि बीआरएसच्या घोष वाक्याप्रमाणे,”अब की बार किसान सरकार’ तयार करूत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आत्महत्या जास्त होत आहेत. कोणीही व्यक्ती उगीच आत्महत्या करत नाहीत. त्याचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर तो आत्महत्येकडे वळतो या बाबीला सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. धर्माच्या नावावर, रंगबेरंगी ध्वजांच्या नावावर जाती-पातीवर एकत्र न होता तुम्ही शेतकऱ्यांसाठी एकजुट व्हा. कारण भारताच्या लोकसंख्येतील 42 टक्के व्यक्ती हे शेतकरी आहेत.एका दिव्यावरुन दुसरा दिवा जोडून पुढे चाला. भारत बुध्दजीवी देश आहे कमी बुध्दीचा नाही.याचे उदाहारण सांगतांना केसीआरांनी आणीबाजीचा उल्लेख केला. त्या काळी जनतेने दिग्गज नेत्यांना फेकुन दिले होते. आपण स्वत: खासदार, आमदार व्हाव तेंव्हाच शेतकरी सरकार येईल. शेतकऱ्यांना नांगर चालवता चालवता कायदा बनवता आला पाहिजे यासाठी काम करायचे आहे. भारतात भरपुर संपत्ती आहे परंतू प्रजा वंचित आहे. भारत अमेरिकेपेक्षा जास्त श्रीमंत आहे.

भारतातील संपत्तीचा उल्लेख करतांना केसीआरांनी भारतातील पाणी, भुमी, कोळसा आणि काम करणारी 140 कोटी जनता असा उल्लेख केला. भारतात 50 टक्के भुमिकी कृषी योग्य आहे. भारतात एकूण भुभाग 83 कोटी एकर आहे. त्यातील 41 कोटी जमीन कृषी योग्य आहे. भारतात दरवर्षी 1 लाख 40 हजार टीएमसी पाऊस पडतो. त्यातील अर्ध्या पाण्याचे बाष्पीभवन होते. 70-75 हजार टीएमसी पाणी नद्यांमध्ये वाहते. 50 हजार टीएमसी पणी वाहुन समुद्रात जाते. फक्त 20-21 हजार टीएमसी पाण्याचा उपयोग होतो. भारतात 300 एक बीलीयन टन कोळसा उपलब्ध आहे. त्यातून पाणी आणि कोळसाचा उपयोग करून 24 तास विज पुरवठा केला तरी भारताला 125 वर्ष विज पुरवठा होवू शकतो. पण मनाची तयारी नेत्यांची नाही आणि म्हणून असे घडले आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहेत. त्यातील 54 वर्ष कॉंग्रेसचे राज्य होते. 16 वर्ष बीजेपीचे राज्य होते. इतर तीन ते पाच वर्षामध्ये अनेक सरकार आले आणि गेले. झिंम्बाबेसारख्या छोट्या देशात 6 हजार 500 टीएमसी पाण्याचा साठा करण्याची क्षमता आहे. मग भारतात 50 हजार टीएमसी पाणी वाहुन का जाते असा प्रश्न केसीआर यांनी उपस्थित केला. फक्त मनकी बात करून किंवा मेक इन इंडिया असे घोष देवून जनतेला फायदा होत नसतो त्यासाठी मानसीक तयारीची आवश्यक असते हे सांगतांना भारतातील दुर्देवाला कॉंग्रेस आणि बीजेपी हे दोनच राजकीय पक्ष जबाबदार असल्याचे केसीआर म्हणाले.
तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांचा पिक विम्याचा 100 टक्के हप्ता बीआरएस सरकारच भरते.शेतकऱ्याला प्रतिऐकरप्रमाणे दहा हजार रुपये वेगळे दिले जातात. शेती उत्पादनासाठी 7 हजार खरेदी केंद्र आहेत. शेतकरी नैसर्गिक मृत्यूने जरी मेला तरी त् यांच्या कुटूंबाला पाच लाख रुपये दिले जाता असे अनेक उदाहरण त्यांनी तेलंगणा राज्यातील सांगितले.
भारत देशासाठी कोणतेही ध्येय नाही अणि फक्त निवडणुका जिंकण्यासाठी दंगे करा, दारु पाजा, खून करा असेच सुरू आहे. कधीपर्यंत सहन करणार आपण हे. भारतीय संविधानात कमरता आहे काय, किंवा सरकार गंभीर नाही काय असा प्रश्न उपस्थित केला. 13 महिने चालले शेतकरी धरणे आंदोलन उल्लेखीत करून केसीआर म्हणाले त्यात काहीच उपलब्ध झाले नाही.आता विखुरलेल न राहता एकत्र येण्याची गरज आहे. तरच सरकार बनवु, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये गुलाबी झेंडा हाती घ्या आणि शेतकरी सरकार बनवा.
बीआरएस पक्षाची 288 वाहने महाराष्ट्राच्या 288 मतदार संघात काही दिवसांत फिरतांना दिसतील. त् यांना प्रतिसाद द्या आणि या सर्व वाहनांची सुरूवात शिवनेरी गडापासून केली जाणार आहे आणि त्यानंतर मी सर्व महाराष्ट्रीभर फिरणार आहे असे केसीआर म्हणाले. जय महाराष्ट आणि जय भारत अशी घोषणा देवून केसीआर यांनी आपले मनोगत समाप्त केले. या सभेत जवळपास 1 लाखांच्या संख्येत जनता उपस्थित होती. केसीआर यांचा कार्यक्रम योग्य होण्यासाठी तेलंगणा राज्यातून अतिरिक्त पोलीस महासंचालकांसह अनेक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आले होते. नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, डॉ. खंडेराय धरणे यांच्या नेतृत्वात भरपूर मोठ्या पोलीस पथकाने मेहनत घेतली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने केसीआर यांची सभा उधळून लावणार अशी घोषणा मनसे नेते राज ठाकरे यांनी केली होती.नांदेड जिल्ह्यातील मनसे नेते मॉन्टीसिंघ जहागिरदार यांच्यासह अनेक जणांनी केसीआर सभेकडे जात असतांना पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले.