बाभळी बंधाऱ्याचा प्रश्न महाराष्ट्रातील नेत्यांनी संपर्क साधला तर मी काही मिनिटातच संपवतो-तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर

नांदेड(प्रतिनिधी)-बाभळी बंधाऱ्याबाबत महाराष्ट्राच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. तो मुद्दा मी सामोपचाराने काही मिनिटातच मिटवून टाकतो. एवढेच नव्हे तर माझ्या राज्यातील श्रीराम सागर बाबत संधी करून त्यातील पाणी मी महाराष्ट्राला द्यायला तयार आहे असे बीआरएस (भारत राज समिती) पक्षाचे संस्थापक, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी अभिवचन दिले.
आज बीआरएस पक्षाच्या भारतीय मान्यतेनंतर नांदेडमध्ये पहिली सभा झाली.त्यानंतर केसीआर पत्रकारांशी बोलत होते. नांदेड जिल्ह्यातील बाभळी बंधाऱ्याच्या मुद्दा समोर आला तेंव्हा केसीआर म्हणाले महाराष्ट्रातील नेत्यांसमोर मी माझ्या अनेक मंत्र्यांनी अनेक फेऱ्या मारल्या. पण त्यातून फलीत काही होत नाही. इतरही अनेक प्रकल्प महाराष्ट्र आणि तेलंगणाशी जोडलेले आहेत. त्याबद्दल नेहमी आम्ही महाराष्ट्रातील नेत्यांच्या संपर्कात असतो. बाभळी प्रश्न काही मिनिटातच मी सोडवू शकतो. पण महाराष्ट्राच्या नेत्यांनी माझ्याकडे यायला हवे. मी बाभळी प्रश्नच नव्हे तर आता तर देशाच्या पाणी प्रश्नावर बोलत आहे. तेंव्हा मी बाभळीसारख्या एक टीएमसी पाणी थांबवणाऱ्या विषयावर जास्त वेळ लावणारच नाही. बाभळी बंधाऱ्यातून सुरू असलेले नाटक महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तिनही राज्यांच्या जनतेसोबत सुरू असलेला खेळ आहे. गोदावरी नदीपात्रातून 2-4 हजार टीएमसी पाणी वाहुन समुद्राला मिळते अशा परिस्थितीत महाराष्ट्र-तेलंगणा-आंध्र प्रदेश या राज्यांच्या नेत्यांनी हा प्रश्न एकत्रितपणे सोडवला पाहिजे आणि मी त्यासाठी सदैव उपलब्ध आहे. बाभळी बंधाऱ्याच्या प्रश्नासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना मी त्यांना खुपवेळेस भेटलो आहे. पण त्यातून काहीच निष्कर्ष मात्र निघाला नाही. माझ्या राज्यात असलेल्या श्रीराम सागर धरणाबाबत संधी केली तर मी त्यातील पाणी महाराष्ट्रातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांना देण्यासाठी तयार आहे.
अदानी हा मोदींमुळेच मोठा झाला. म्हणून त्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी लावली जात नाही. भारतीय जीवन विमा निगमचे खाजगीकरण झाले तरी बीआरएस पक्ष सत्तेत आला तर त्याचे शासकीयकरण करेल. विदेशातून एक किलो कोळसा आयात करण्याची गरज नसतांना लाखो टन कोळसा मागवला जात आहे. तो अदानी मागवतो. अदानी हा मोदीजींचा मित्र आहे. म्हणून तसे होते. ज्या ठिकाणी नुकसान होते तर त्याचे खापर सरकार जनतेवर फोडते आणि ज्यामध्ये फायदा असेल त्याचे सरकार खाजगीकरण करते असे चालणार नाही. त्यासाठी बीआरएस पक्ष सदैव जनतेच्या फायद्याचा विचार करेल. भारतीय नेत्यांना ज्ञान कोठून प्राप्त होते ते घ्यायला हवे. याच गतीने देश चालणार असले तर देशाची प्रगती अशक्य आहे. बीआरएस पक्षाच्या कार्यपध्दतीबद्दल बोलतांना केसीआर म्हणाले त्यासाठी 100-125 लोक काम करत आहेत. ती पध्दती पुर्ण तयार झाल्यानंतर मी पत्रकारांच्यावतीने ती देशातील जनतेसमोर मांडणार आहे. देशात छोटे-छोटे राज्य किंवा लोकसंख्या निहाय राज्य बनविण्यासाठी बीआरएसचा पाठींबा आहे. पण त्यासाठी उच्च स्तरावरून नियोजन होण्याची आवश्यकता आहे.
भारतात सौरउर्जा ही पण एक मोठी शक्ती आहे. भारतात कोठे शितलता, कोठे जास्त उष्णता आणि कोठे दमट हवामान आहे या भागात तयार होणारी वेगवेगळी खाद्य पदार्थ तयार होता. या खाद्यपदार्थांची एक चैन तयार करून त्यातून एक उत्कृष्ट फुड प्रोसेसिंग उद्योग उभारला जाऊ शकतो पण भारताचे दुर्देव यांनी आज मॅगडोनॉल्ड खातो त्यावर सुध्दा बीआरएस पक्ष काम करणार आहे.
दिल्लीच्या विमानतळावर उतरण्यासाठी 45 मिनिट हवेत फेऱ्या माराव्या लागतात अशा परिस्थितीत वेळेचा अतिरिक्त खर्च होतो. यासंदर्भाने त्यांनी रेल्वे मालवाहतुकीचा वेग दरतासाला भारतात 24 किलो मिटर आहे, हाच वेग चिनमध्ये 120 किलो मिटर दरतास आहे. तसेच भारतात ट्रकद्वारे मालवाहतुकीची गती 50 किलोमिटर प्रति तास आहे. हीच गती जपानमध्ये 80 किलो मिटर आणि युकेमध्ये 95 किलो मिटर प्रति तासाने आहेे. मग आम्ही त्यांच्या बरोबरीला केंव्हा जाणार.
देशातील प्रत्येक शेताला पाणी दिले तरीही 40 हजार टीएमसी पाणी लागेल. त्यानंतर सुध्दा साठवणूक योग्यरितीने झाली तर पुढच्या 100 वर्षात सुध्दा शुध्द पाण्याची कमतरता राहणार नाही असे केसीआर सांगत होते. बीआएस पक्ष सत्तेत आला तर पाण्याच्या मिसीमध्ये मोठे बदल होतील. जे भारतासाठी अत्यंत गरजेचे आहेत. कारण आजच्या परिस्थितीत भारतात कोठे दुष्काळ तर कोठे महापुर अशी परिस्थिती असते. मी सांगितलेले सर्व आकडे केंद्र सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेले आहेत. केसीआरने तयार केलेले नाहीत. पाण्याच्या प्रश्नात शेतकऱ्यांची आत्महत्या जोडून केसीआर यांनी नाना पाटेकरांचा उल्लेख केला. का त्यांना मदत करावी लागते जनतेची? सरकार सक्षम नाही काय? बीआरएस पक्ष सत्तेत आला तर दोन वर्षात भारत विजेच्या झगमगाटाने झळकुन टाकेल. बीआरएस सत्तेत आला तर एकाच वर्षात 33 टक्के महिलांचे आरक्षण पुर्ण करू. देशाला आर्थिक प्रगती करायची असेल तर देशाच्या आर्थिकनितीला बदलण्याची गरज आहे असे केसीआर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संबंधीत बातमी…

https://vastavnewslive.com/2023/02/05/आज-मेक-इन-इंडियाचा-ज्योक-इ/

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *