तुकडे करून लातूरला पाठवतो म्हणून खंडणी मागणारा गजाआड
नांदेड(प्रतिनिधी)-विष्णुपूरी पाटबंधारे विभागातील उपविभागीय अधिकाऱ्याला तुझे तुकडे करतो असे सांगून खंडणी मागणाऱ्या भाग्यनगर पोलीसांनी अत्यंत त्वरीत हालचाल करून गजाआड केले. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, खंडणी मागणीचा काही प्रकार असेल तर त्या संदर्भाने लवकरात लवकर संबंधीत पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती द्यावी.
दि.3 फेबु्रवारी रोजी विष्णुपूरी पाटबंधारे विभागातील उपविभागीय अधिकारी अरुण नारायण अंकुलवार यांना एका फोनवरून धमकी आली की, तुझे तुकडे करून लातूरला पाठवून देईल नाही तर मला 51 हजार रुपये दे. अरुण अंकलवार यांनी फोन करणाऱ्याचे नाव विचारले असता त्याने खंडणीची रक्कम 1 लाख 1 हजार रुपये केली. याबद्दल भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेतले. तेंव्हा पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात भागयनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे, पोलीस अंमलदार किशोर हुंडे, गनर्दनमारे यांनी तुकडे करून लातूरला पाठवतो म्हणणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या मारोती जळबाजी चिंतले यास गजाआड केले.
या संदर्भाने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, अशा प्रकारे कोणी खंडणीची मागणी करत असेल तर जनतेने गुपचूप न बसता याबद्दलची माहिती अत्यंत जलदगतीने संबंधीत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना द्यावी अशा खंडणीखोरांवर पोलीस विभाग तत्परतेने कार्यवाही करेल.

संबंधीत बातमी….
https://vastavnewslive.com/2023/02/04/पांडूरंग-येरावार-सावकारल/