नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेवर अनेकांनी अर्जुनासारखा मासाच्या डोळ्यावर वेध धरल्याप्रमाणे नेम धरला होता. परंतू या सर्वांना बाजूला सारुन सोंगाड्याने थेट गृहमंत्र्यापासून आपली नियुक्ती नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेवर व्हावी यासाठी सेटींग लावल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. या सोंगाड्याच्या जीवनातील पोलीस सेवेतील शेवटचा दिवस 31 ऑक्टोंबर 2023 आहे. तरी पण पहा किती मर-मर करावी लागते.कशासाठी पण ? याचे उत्तर ते सध्याचे स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक उत्तमपध्दतीने देवू शकतील.कारण ते त्यांचे बॅचमेंट आहेत.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेवर डिसेंबर 2019 मध्ये पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांची नियुक्ती झाली. आपल्या जीवनात त्यांनी कमावलेले कलागुण वापरुन केलेल्या कलाकारीमुळे त्यांनी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेवर तीन वर्ष आपला दबदबा कायम ठेवला. आता त्यांच्या सेवासमाप्तीची दिनांक सुध्दा सहा महिन्यांची शिल्लक राहिली आहे. सेवासमाप्तीच्या शेवटच्या कालखंडात पोलीस विभागातील लोकांना त्यांच्या मर्जीप्रमाणेच नियुक्ती द्यावी असा कायदा आहे. सध्या तरी द्वारकादास चिखलीकर यांना हे पद सोडायचे नाही. कारण त्यांची सेवासमाप्तीची दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे. आणखीन 30-32 दिवस ते या पदावर राहिले तर तो सुध्दा एक रेकॉर्ड होईल. सध्याच्या दिसत्या परिस्थितीमध्ये पोलीस विभागातील बदल्या रखडल्या आहेत. पदोन्नत्या रखडल्या आहेत अशा परिस्थितीत चिखलीकरांच्या खुर्ची सोडण्याचे कोणतेही चिन्ह सध्या तरी दिसत नाही. त्यांनी आपली बदली करू नये असा अर्ज सुध्दा दिलेला आहे.
पण स्थानिक गुन्हा शाखेतील नाम फलकावर आपले नाव कोरले जावे ही मानसिकता सर्वच पोलीस निरिक्षकांची असते. का असते ही इच्छा याचा अभ्यास करण्याइतपत आम्ही शिक्षण घेतलेले नाही. द्वारकादास चिखलीकर 2022 च्या मे मध्येच जाणार म्हणून अनेक पोलीस निरिक्षकांनी आपल्या गुडघ्याला बाशिंगे बांधली होती. त्यात काही लोखंड पुरूष सुध्दा होते. हळूहळू 2023 उजाडला. आता तर 2023 च्या दुसऱ्या महिन्याचा पहिला आठवडा संपला आहे. तरी पण द्वारकादास चिखलीकर हे मात्र तेथेच आहेत. डिसेंबर 2022 पासून पुन्हा एकदा या चर्चेला जोर आला की, आता स्थानिक गुन्हा शाखेची खुर्ची माझी. काही जणांनी तर आता मी आलोच अशा धमक्या दोन नंबरवाल्यांना द्यायला सुरूवात पण केली होती. अनेकांनी आपआपले देव पाण्यात ठेवलेले आहेत.
पण या सर्व तयारीमध्ये सोंगाड्या सर्वात उच्च पातळीवर गेल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. थेट गृहमंत्र्याकडे अर्ज करून सोंगाड्याने नांदेड जिल्ह्यामध्ये नसतांना नांदेडमध्ये यावे आणि आल्यावर स्थानिक गुन्हा शाखा मिळावी अशी मोठी सेटींग लावल्याची चर्चा सुरू झाली आहे. ज्या ठिकाणी सोंगाड्या आहे त्या ठिकाणी आता मी शेवटच्या काही महिन्यांसाठी नांदेडमध्ये जात आहे आणि नांदेडमध्ये मला साईड ब्रॅंच हवी अशी बतावणी करत आहे.कारण ज्यांना हे सांगितले जात आहे त्यांना हे माहितीच नाही की, स्थानिक गुन्हे शाखा सुध्दा साईड ब्रॅंचच आहे. ज्या पोलीस निरिक्षकांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीसाठी आपल्या देवांना थंडीच्या दिवसात पाण्यात ठेवले आहे. आता त्यांनी माघार घ्यायला हवी असेच वास्तव न्युज लाईव्हला सुचवायचे आह
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेसाठी सोंगाड्याची गृहमंत्र्यांकडे सेटींग ?