
नांदेड(प्रतिनिधी)-उद्या दि.7 फेबु्रवारी रोजी माता रमाई आंबेडकर यांची 125 वी जयंती साजरी होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत होणारे लोडशेडींग करू नये असे निवेदन शिवाजीनगर भागातील वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता बोईनवाड यांना दिले. तसेच माता रमाई जयंती निमित्त उद्या संपुर्ण नांदेड शहरात पाणी पुरवठा करावा असे निवेदन मनपातील पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे यांना भिम जयंती मंडळाचे अध्यक्ष राहुल सोनसळे यांनी दिले.
दि.7 फेबु्रवारी रोजी माता रमाई आंबेडकर यांची 125 वी जयंती साजरी होणार आहे. यासंदर्भाने होणारे लोडशेडींग जयंती महोत्सवात अडचणी आणू शकतील म्हणून सार्वजनिक भिम जयंती मंडळाच्यावतीने शिवाजीनगर भागातील सहाय्यक अभियंता यांना निवेदन देवून 7 फेबु्रवारी रोजी लोडशेडींग करू नये अशी विनंती करण्यात आली.
तसेच प्रत्येक कार्यक्रमामध्ये पाणी हा एक महत्वपूर्ण विषय आहे. त्या संदर्भाने सार्वजनिक भिम जयंती मंडळाच्यावतीने महानगरपालिकेत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे यांना निवेदन देवून संपुर्ण नांदेड शहरामध्ये 7 फेबु्रवारी रोजी पाणी पुरवठा करावाच अशी विनंती करण्यात आली आहे.
या निवेदनावर सार्वजनिक भिम जयंती मंडळाचे अध्यक्ष राहुल सोनसळे, ऍड.यशोनिल मोगले, अतिश ढगे, महेश पंडीत, प्रशांत भालेराव, सौरभ खंदारे, तेजस रोटे, कुलभूषण कांबळे, गोलू कांबळे, संकेत सोनकांबळे, रोहित कागडे, संघर्ष गायकवाड यांच्यासह अनेकांची स्वाक्षऱ्या आहेत.
