नांदेड,(प्रतिनिधी)- कवी मनाचे आयपीएस अधिकारी गौहर हसन यांची नियुक्ती नांदेड जिल्ह्यात नांदेड ग्रामीण उप विभागात करण्यात आली आहे. तसेच बिलोली उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना पदोन्नती देत नागपूर शहरात पोलीस उप आयुक्त पदावर पाठवण्यात आले आहे. आज हे आदेश गृह विभागाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे. सुशांत सिंह या आयपीएस अधिकाऱ्यांना साकोली उप विभाग जिल्हा भंडारा येथे नियुती देण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील नांदेड ग्रामीण हे पोलीस विभाग रिकामेच राहिलेले होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या आणि बदल्या प्रलंबित आहेतच.अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील धारणी उप विभागात कार्यरत आयपीएस अधिकारी सहायक पोलीस अधीक्षक गौहर हसन यांना नांदेड ग्रामीण उप विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. या पोलीस उप विभागात अर्धापूर, लिंबगाव, मुदखेड आणि बारड असे चार पोलीस ठाणे येतात.
तसेच बिलोली उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना पदोन्नती देऊन नागपूर शहरात पोलीस उप आयुक्त पदावर पाठवण्यात आले आहे.त्यांच्या पत्नी सौम्या शर्मा यांची काही महिन्यांपूर्वीच नागपूर येथे बदली झाली आहे.अर्चित चांडक यांनी भरपूर छान कामगिरी नांदेड जिल्ह्यात केली आहे.नांदेड येथील अनेकांनी त्यांना नवीन जबाबदारीसाठी शुभकामना दिल्या आहेत.
गौहर हसनला गालिब आवडतात
गौहर हसन हे बिहार राज्यातील मोतीहारीचे आहेत. त्यांना शायर गालिब आवडतात.गालिब यांचा एक शेर आशिक़ी सब्र-तलब और तमन्ना बेताब,दिल का क्या रंग करूँ ख़ून-ए-जिगर होने तक या शब्दांनी मला यूपीएससी पार करण्याची प्रेरणा दिली असे ते सांगतात.एसएससी परीक्षेत ७० टक्के गुण घेणारे गौहर हसन याना युईएससीने खूप झुंजवले. पण प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांनी यश खेचून आणले. आपल्या जीवनातील संघर्षानंतर प्राप्त झालेल्या यशा बद्दल ते शायरीत सांगतात की,जिस दिन से चला हूँ मिरी मंज़िल पे नज़र है,आँखों ने कभी मील का पत्थर नहीं देखा . गया अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक जमील अहमद यांचे ते पुत्र आहेत.त्यांच्या आई नगमा कौसर या गृहिणी आहेत.तर छोटा भाऊ समाजशास्त्राचा विध्यार्थी आहे. छोटी बहीण वास्तुशात्राची विद्यार्थिनी आहे. मोठ्या बहिणीचे लग्न झालेले आहे. असे उच्च शिक्षित गुरुजी पुत्र आणि कवी मनाचे गौहर हसन हे नांदेड जिल्ह्यात येणार आहेत.