नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील श्रीनगर भागात एका युवकाच्या मृत्यूनंतर दोन वेगवेगळे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर भाग्यनगर पोलीस याबद्दल सध्या तपासणी करत आहेत.
भाग्यनगर पोलीसांना आज दि.07 फेबु्रवारी रोजी सकाळी 2.30 वाजता शासकीय रुग्णालयातून आलेल्या एमएलसीनुसार महारुद्र हनुमान मंदिर श्रीनगर येथील एका गच्चीवरून पडून राधेशाम अग्रवाल(23) या युवकाचा मृत्यू झाला आहे. त्याबदलची कार्यवाही सुरू होती. त्यानंतर सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास दुसरी एमएलसी आली की, त्याच्या पोटात चाकूने भोकसलेले आहे. हा राधेशाम अग्रवाल पोलीस पेट्रोलपंप स्नेहनगर येथे काम करतो.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे घटनास्थळाचा आढाव घेत आहेत. तसेच काही अधिकाऱ्यांना प्रेतपंचनामा करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे.
श्रीनगर हद्दीत 23 वर्षीय युवकाचा खून