आजपासून भाग्यनगर येथे पोलीस निरिक्षक अनंत्रे तर अर्धापूरला गायकवाड
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील बदली झालेले भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे आणि अर्धापूर येथील अशोक जाधव यांना आज नांदेड जिल्ह्यातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी सध्या तात्पुरत्या स्वरुपात अनुक्रमे अशोक अनंत्रे आणि हनुमंत गायकवाड यांना पाठविण्यात आले आहे.
2022 या वर्षात पोलीसांच्या सर्वसाधारण उशीराच झाल्या होत्या.त्यात बऱ्याच जणांच्या बदल्या झाल्या. तीन पोलीस निरिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. त्यातील दोघांना आज कार्यमुक्त करण्यात आले आहे. भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांची बदली वाशीम जिल्ह्यात झाली आहे. त्यांच्या जागी सध्या तात्पुरत्या स्वरुपात पोलीस निरिक्षक अशोक अनंत्रे यांना नियुक्ती मिळाली आहे. अर्धापूरचे पोलीस निरिक्षक अशोक जाधव यांची बदली अमरावती ग्रामीण जिल्ह्यात झालेली आहे. त्यांनाही आज कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी तापुरत्या स्वरुपात हनुमंत गायकवाड यांना पाठविण्यात आले आहे. वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने सुधाकर आडे आणि अशोक जाधव यांना आपल्या नवीन जबाबदारीसाठी हार्दिक शुभकामना.
भाग्यनगरचे आडे आणि अर्धापूरचे जाधव नवीन जबाबदारीसाठी कार्यमुक्त