नांदेड(प्रतिनिधी)-67 व्या ज्युनिअर महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन काल दि.7 फेबु्रवारी रोजी नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. या स्पर्धेचे आयोजक लातूरच्या असद स्पोर्टस ऍकॅडमीने केले आहे. या संघटनेचे अध्यक्ष इतवारा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक शेख असद हे आहेत.
नांदेड शहरातील इंदिरा गांधी क्रिडा संकुलाच्या मैदानावर काल बॉल बॅडमिंटन स्पर्धेची सुरूवात झाली. या स्पर्धेच्या उद्घाटनात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, इतर प्रमुख उपस्थितांमध्ये सय्यद मोईन, रऊफ जमीनदार, केशव मालेवार, योगेश मोगडपल्ली, ज्ञानोबा भोसले यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र बॉल मॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष डॉ.पी.के.पटेल, सरचिटणीस अतुल इंगळे, कोषाध्यक्ष विजय पळसकर, कार्यकारी अध्यक्ष बी.एस.गोसावी, निरिक्षक राजाभाऊ भंडारकर आणि उपाध्यक्ष रुषीकेश पापडकर हेही या कार्यक्रमात उपस्थित होते.
दि. 7 ते 9 फेबु्रवारी दरम्यान होणाऱ्या राज्य ज्युनिअर बॉल मॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यांमधून 350 मुले आणि 350 मुली तसेच 90 इतर कार्यालयीन अधिकारी उपस्थितीत आहेत. यांच्या राहण्याची आणि जेवण्याची दर्जेदार सोय करण्यात आली आहे.काल एकूण 39 सामने झाले. त्यात पुणे महानगर, लातूर, हिंगोली यांनी विजयी सुरूवात केली. कार्यक्रमाच्या प्रत्येक नियोजनावर असद ऍकॅडमीचे अध्यक्ष पोलीस उपनिरिक्षक शेख असद बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते 67 व्या ज्युनिअर राज्य बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन