भोकर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत ” जागरूक पालक, सुदृढ बालक ” अभियान आज दि.9 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शाळा किनवट रोड भोकर येथील शाळे मध्ये अभियान सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष भोकर उपविभागीय अधिकारी व तहसिलदार राजेश लांडगे, गटविकास अधिकारी अमित राठोड, वैद्यकीय अधिक्षक डॉ अनंत चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ राहुल वाघमारे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
अभियानाचे प्रास्ताविक डॉ अनंत चव्हाण, डॉ राहुल वाघमारे यांनी केले. भोकर शहर व तालुक्यात या अभियान मध्ये 0 ते 18 वर्षापर्यंतची बालके व किशोरवयीन मुलामुलींचे सर्वागीण तपासणी करण्यात येणार आहे.
यावेळी पत्रकार राजेश वाघमारे, सिद्धार्थ जाधव, कदम, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पी.एल. खोकले, सहशिक्षक अविनाश रेड्डी, रामदास पुणेबोईनवाड, संजय खांडरे, तालुका समन्वयक जगदीश थडवे, अंगणवाडी पर्यवेक्षक कंरमकोडा मॅडम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे डॉ व्यंकटेश टाकळकर, डॉ अविनाश गुंडाळे, डॉ अपर्णा जोशी, डॉ ज्योती यन्नावार, आरोग्य सहाय्यक सत्यजीत टिप्रेसवार, एम ऐ सय्यद, औषध निर्माण अधिकारी गिरी रावलोड, आरोग्य कर्मचारी पांडुरंग तमलवाड, आरोग्य सेविका स्वाती सुवर्णकार, गजानन तमलवाड, जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.
भोकर येथे जागरूक पालक, सुदृढ बालक अभियान