स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक चव्हाण सलग्न

नांदेड(प्रतिनिधी)-श्रेणी पोलीस उपनिरिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना आहे त्याच ठिकाणी पोलीस उपनिरिक्षक पद दिले गेले. पण त्यापुर्वी पोलीस महासंचालकाच्या आस्थापनेवरुन ज्या पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पद मिळाले त्यांच्या नियुक्त्यांमधील एक पोलीस उपनिरिक्षक आजही पोलीस नियंत्रण कक्षातून स्थानिक गुन्हा शाखेत सलग्न आहेत. अशा सलग्न असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा आणि अंमलदारांचा सुध्दा विचार पुढे येणाऱ्या बदल्यांमध्ये होईल अशी अपेक्षा आहे.
पोलीस उपनिरिक्षक पद अनेक कारणांनी सन 2013 पासून चर्चेत होते. सन 2013 मध्ये पोलीस अंमलदारांनी दिलेल्या परिक्षानंतर त्यांना पोलीस उपनिरिक्षक ही पदस्थापना मिळण्यास भरपूर कालावधी लागला.त्यात नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावर असलेले परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण हे पोलीस महासंचालकांच्या आस्थापनेवरुन पोलीस उपनिरिक्षक या पदावर आले. पोलीस महासंचालक कार्यालयाने त्यांना विशेष पोलीस उपमहानिरिक्षक परिक्षेत्र नांदेड यांच्याकडे पाठविले. विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे चार जिल्ह्यातून आलेल्या या नवीन पोलीस उपनिरिक्षकांना त्या-त्या जिल्ह्यांच्या पोलीस अधिक्षकांकडे पाठविले. त्यात परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यात देण्यात आल्यानंतर त्यांची नियुक्ती जिल्ह्याची जबाबदारी देत पोलीस नियंत्रण कक्षात झाली.
नियंत्रण कक्षात नियुक्ती होताच कुठे तरी काही तरी ठेवले गेले. जेथे ठेवले गेले त्यांनी पुर्ण प्रतिसाद न देता सलग्न या नावाखाली परमेश्र्वर चव्हाण यांना स्थानिक गुन्हा शाखेत सुरूवातीला तोंडी आदेशावर मंजुरी दिली. सलग्न ही मंजुरी आजही लेखी स्वरुपात तयार झाली की नाही याची माहिती प्राप्त झाली नाही. पण तोंडी आदेशावरच सलग्न या शब्दावर परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण स्थानिक गुन्हा शाखेत आपले राज्य गाजवत आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत असलेले पोलीस अंमलदार दशरथ जांभळीकर हे मागेच बदली होवून त्यांची पदस्थापना जीपीयु मध्ये झालेली आहे. ते सुध्दा सलग्न या शब्दांवर स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत आहेत. तानाजी येळगे यांची पदस्थापना देगलूर पोलीस ठाण्यात आहे. ते सुध्दा सलग्न या शब्दावर स्थानिक गुन्हा शाखेतच कार्यरत आहेत. तसेच रविकिरण बाबर यांची नियुक्ती पोलीस मुख्यालयात असतांना सुध्दा ते आजही स्थानिक गुन्हा शाखेतच कार्यरत आहेत.
सलग्न या शब्दावर वास्तव न्युज लाईव्हने मांडलेला विषय स्थानिक गुन्हा शाखेचा असला तरीही पोलीसांच्या किती विभागांमध्ये सलग्न शब्दावर पोलीस अधिकारी आणि अंमलदार कार्यरत आहेत याचा विचार सुध्दा येणाऱ्या सर्वसामान्य बदल्यांमध्ये व्हावा अशी अपेक्षा आहे. स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदार तर मागील किती वर्षापासून स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत आहेत याचा अभिलेख उपलब्ध आहे. तरी पण ते आजही त्याच शाखेत का आहेत? इतर पोलीस अंमलदारांचा त्यांची कामे करता येत नाहीत काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही दिवसांपुर्वीच बदली झालेल्या सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदारांना नवीन नियुक्तीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत. कारण त्यानंतरच प्रत्येक विभागात मंजुर असणारी मनुष्यबळ संख्या, रिक्त असणारी पदे याचा गुणाकार आणि भागाकर करून नवीन बदल्या करता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *