नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांनी एका व्यक्तीची बळजबरी लुट केली आहे. मौजे उंद्री पदे ता.मुखेड या गावात काही घरे फोडून चोरट्यांनी 5 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
शेख मैनोद्दीन शेख राजेसाब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 फेबु्रवारी रोजी सकाळी 10.20 वाजता सिडकोच्या स्मशानभुमी रस्त्यावर ते ऍटोमध्ये बसून जात असतांना त्यांना 3 बुलेट गाडीवर आलेल्या 20 ते 25 वयोगटातील लोकांनी ऍटो समोर बुलेट लावली आणि ऍटोवाल्याला पैशांची मागणी केली. ऍटोचे हेड लाईट आणि काचा फोडल्या. शेख मैनोद्दीनला खाली उतरवून त्यांना पकडले आणि त्यांच्या पॅन्टच्या खिशात असलेले 7 हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. स्वत:च्या हातात असलेल्या चाकूने आरोपींनी शेख मैनोद्दींच्या गळ्यावर वार केला आणि वीट घेवून त्याचाही प्रहार त्यांच्यावर केला. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक डाकेवाड अधिक तपास करीत आहेत.
नामदेव शंकरराव गनलेवाड रा.उंद्री पदे ता.मुखेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 फेबु्रवारीच्या मध्यरात्री 12.30 ते 3.30 दरम्यान त्यांचे आणि गावातील इतर लोकांची घरे फोडून चोरट्यांनी त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे, रोख रक्कम असा 5 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक फड अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी; मुखेडमध्ये 5 लाखांची चोरी