नांदेड(प्रतिनिधी)-9 फेबु्रवारी रोजी सायंकाळी एका युवकावर बंदुकीतून हल्ला करणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केले आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकारांना दिली.
नांदेड शहरातील वसंतानगर भागात एक युवक शेख इरफान उर्फ कुबडा याच्या पोटात गोळी झाडण्यात आली. शेख इरफान उर्फ कुबडाचे वडील शेख गुड्डू शेख इस्तगिर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलावर गोळी झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न संतोष लक्ष्मण कर्णेवाड (30) आणि हरजितसिंघ उर्फ जितू लखविंदरसिंघ पन्नू (31) या दोघांनी केला होता.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार मोतीराम पवार, बालाजी यादगिरवाड आणि हेमंत बिचकेवार यांनी संतोष कर्णेवाड आणि हरजितसिंघ पन्नू या दोघांनाा काल रात्रीच ताब्यात घेतले आहे.यांना पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे विमानतळ यांच्या स्वाधीन केले जाणार आहे.
संबंधित बातमी…
https://vastavnewslive.com/2023/02/10/शहरात-पुन्हा-एकदा-गुंजला/