ईस्लापूर पोलीस ठाण्यात अर्धनग्नकरून युवकांना मारहाण करणाऱ्या एपीआयला निलंबित करा-विश्र्व हिंदु परिषद

नांदेड(प्रतिनिधी)-ईस्लापूर पोलीस ठाण्यात शिवणी ता.किनवट येथील युवकांना पोलीस ठाण्यात जबर मारहाण करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरिक्षक रघुनाथ शेवाळे विरुध्द विश्र्व हिंदु परिषदेच्या सदस्यांनी तक्रार केली आहे. काही दोन चौकशा सुरू असल्याची माहिती काल पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली होती त्यातील एक चौकशी रघुनाथ शेवाळे यांची असू शकते.
विश्र्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते विभाग गोरक्षा प्रमुख किरण बिचेवार, देवगिरी प्रांत प्रमुख शशिकांत पाटील, जिल्हा मंत्री श्रीराज चक्रावार, महानगर मंत्री गणेश कोकुलवार, गणेश यशवंतकर आणि बजरंग दल जिल्हा संयोजक मनोज मामीडवार यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, दि.1 फेबु्रवारी 2023 रोजी तल्हारी येथून तीन वळू कत्तलीसाठी जात असल्याची माहिती पोलीस अधिक्षक व रघुनाथ शेवाळे यांना कळवली होती. अशा प्रकारांमध्ये पैसे घेवून गुन्हा न दाखल करता गाड्या सोडल्या जातात. असाच एक प्रकार 1 फेबु्रवारी रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भाने घडला. त्या गाडी मालकावर पुर्वीचे दोन गुन्हे सुध्दा आहेत. ईस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रघुनाथ शेवाळे यांनी घटनास्थळांवरून सात ते आठ कसायांना पळून जाण्याची सुट दिली आणि विहिपच्या कार्यकर्त्यांनाच पोलीस गाडीत डांबून ठेवले.
दि.4 फेबु्रवारी रोजी शिवणीच्या यात्रेत काही तरुणांचे भांडण झाले. त्या भांडणात 60 ते 70 जण असतांना गोरक्षणाच्या कार्यवाहीत सहभागी तरुणांना निवडूण 5 फेबु्रवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता त्या तरूणांना ईस्लापूर पोलीस ठाण्यात बोलावले. 10 तरुणांना कोणतीही चौकशी न करता तल्हारी येथील नागरीकांसमोर बेकायदेशीरपणे मारहाण करून अपमानीत केले आहे. हा मारहाणीचा प्रकार रघुनाथ शेवाळे यांनी गोरक्षेतील तरुणांना लक्षात ठेवून केलेला आहे. तसेच आकस ठेवून बेकायदेशीर मारहाण करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरिक्षक रघुनाथ शेवाळे यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. या मारहाण प्रकरणाचा व्हिडीओ सुध्दा किरण बिच्चेवार यांनी वास्तव न्युज लाईव्हला पाठवला आहे.
भारतात सर्वोच्च स्थानी संविधान आहे. पोलीसांनी संविधानाच्या देखरेखीत तयार झालेले कायदे अंमलात आणायचे असतात. ईस्लापूर पोलीस ठाण्यात झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ तयार होता यावरून सहाय्यक पोलीस निरिक्षक रघुनाथ शेवाळे यांच्या कार्यक्षमतेवर सुध्दा प्रश्न उपस्थित करण्यात आला असेल तर त्यात वावगे काय? रघुनाथ शेवाळे यांना पोलीस ठाण्यात वागणूकीसाठी एखाद्या प्रशिक्षणाची गरज आहे.

संबंधीत व्हिडिओ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *