नांदेड(प्रतिनिधी)-जुना कौठा परिसरातील एक घर फोडून चोरट्यांनी 2 लाख 55 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.फोनवर बोलत चालत असलेल्या एका युवकाचा 26 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी बळजबरी हिसकावला आहे. रातोळी व गडगा ता.नायगाव येथे कापडाचे दुकान आणि पोस्ट ऑफीसचे मशीन चोरून 98 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरण्यात आला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऍटो प्रवासात एका महिलेचे 68 हजार रुपये किंमतीचे गंठण चोरीला गेले आहे.
यदुराज प्रभु कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 फेबु्रवारीच्या रात्री 8.30 ते 12 फेबु्रवारीच्या पहाटे 5.30 वाजेदरम्यान त्यांच्या घरात राहत असलेले भाडेकरू कमलकिशोर महात्मे यांचे घरफोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे 60 हजार रुपयांचे आणि 1 लाख 95 हजार रुपये रोख रक्कम असा 2 लाख 55 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार सुर्यवंशी हे करत आहेत.
सोपान शेषराव पाटील रा.रातोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे रातोळी व गडगा येथील त्यांचे कापड दुकान आणि शेजारी असलेल्या पोस्ट ऑफीसचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, कपडे, पोस्ट ऑफीसमधील आयआरसीटी मशीन असे साहित्य चोरले आहे. तसेच दत्तकृपा मेडीकलचे कुलूप तोडून चोरट्यांनी 30 हजार रुपये रोख रक्कम कॅमेरे आणि डोंगल चोरून नेले आहेत. या सर्व चोरीच्या ऐवजाची किंमत 98 हजार 300 रुपये आहेत. नायगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक वाघमारे अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2 फेबु्रवारी रोजी दुपारी शिवाजी पुतळा ते सिडको मार्गे लातूर फाटा असा ऍटोतून प्रवास करणाऱ्या महिला शांता चंद्रकांत आसनेवार यांच्या बॅगमधील 33 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 68 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी चोरट्यांनी चोरले आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंलदार भारती हे करत आहेत.
महेशकुमार बालाजीराव गुरलेवार हे विद्यार्थी 9 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 7.15 वाजता आनंद चव्हाण, आनंदनगर यांच्या घरासमोरून रस्त्यावर फोनवर बोलत जात असतांना त्यांच्या पाठीमागून मोटारसायकल क्रमांक एम.एच.26 सी.डी. 7458 वर आलेल्या 3 चोरट्यांपैकी मध्ये बसलेल्या चोरट्याने त्यांचा मोबाईल बळजबरी हिसकावून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा जबरी चोरी सदरात दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
चोऱ्यांच्या विविध घटनांमध्ये 4 लाख 47 हजार 300 रुपयंाचा ऐवज लंपास