नांदेड(प्रतिनिधी)-रस्त्यावर अडथळा आणणाऱ्या महिलेला रोखले असता तिने दोन महिला पोलीसांसोबत हुजत घातली. एका महिला पोलीसाचे कपडे फाडले. धिंगाना घालणाऱ्या महिलेविरुध्द रामतिर्थ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रामतिर्थ पोलीस ठाण्यातील महिला पोलीस सुप्रिया दत्तात्रय मगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.12 फेबु्रवारी रोजी सकाळी 10.45 वाजता त्या देगलूर-नरसी रस्त्यावररील नरसी चौक येथे ड्युटीवर असतांना एक 35 वर्षीय महिला रस्त्यावर गोंधळ घालून वाहतुकीला अडथळा निर्माण करत होती. त्यावेळी सुप्रिया मगर यांच्यासोबत दुसऱ्या महिला पोलीस पण होत्या. गोंधळ घालणाऱ्या महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला असता तिने ऐकलेच नाही उलट तिने सुप्रिया मगरचे दोन्ही हात धरले आणि सोबत असणाऱ्या दुसऱ्या महिला पोलीसाचे कपडे फाडून त्यांना मारहाण केली. रामतिर्थ पोलीसांनी गोंधळ घालणाऱ्या महिलेविरुध्द गुन्हा क्रमांक 22/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 323, 294, 332 प्रमाणे दालख केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शेख यांच्याकडे देण्यात आला आहे.
नरसी चौकात गोंधळ घालून महिलेने महिला पोलीसांचे कपडे फाडले, मारहाण केली