नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलात 2005 मध्ये पोलीस शिपाई या पदावर वर्षा पवार या महिला पोलीसाने आपले लिंग परिवर्तन करण्याचा अर्ज पोलीस अधिक्षकांकडे दिला आहे.
वर्षा पवारच्या वडीलांचा मृत्यू झाल्यानंतर सन 2005 मध्ये वर्षाला अनुकंपा तत्वावर नांदेड जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई या पदावर नियुक्ती मिळाली. लहानपणापासूनच पुरूषी वागणूक असणाऱ्या वर्षाने आपल्याला लिंग परिवर्तन करायचे आहे त्यासाठी रजा मंजुर करावी आणि शस्त्रक्रियेसाठी होणारा खर्च सुध्दा शासनाने करावा अशी मागणी करणारा अर्ज दिला.सन 2012 मध्ये वर्षा पोलीस नाईक या पदावर पदोन्नत झाल्या. सन 2018 मध्ये आपण पुरूष असल्याबाबत त्यांना 2018 मध्ये एका चाचणीनंतर लक्षात आले. मुंबईच्या सेंटजॉर्ज हॉस्पीटलने वर्षाची चाचणी बरोबर असून शस्त्रक्रिया करत लिंग परिवर्तन करून घेण्याचा सल्ला सुध्दा दिला. दिल्लीतील एका हॉस्पीटलने वर्षा मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचा निर्वाळा दिला.
पोलीस अधिक्षक, पोलीस महासंचालक यांनी चांगला प्रतिसाद दिला नाही म्हणून वर्षा उर्फ विजय पवारने उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयात हे प्रकरण मॅट कोर्टाचे आहे असा युक्तीवाद करून सरकारी वकीलांनी उच्च न्यायालयातील हे प्रकरण निकाली काढायला लावले. सध्या आज काय परिस्थिती आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता असे समजते की, पोलीस अधिक्षकांनी वर्षा उर्फ विजय पवारचा अर्ज मान्य केलेला आहे. परंतू प्रशासकीय स्तरावरून किंवा अधिकारी स्तरावरून या अर्जाच्या मान्यतेला दुजोरा मात्र मिळालेला नाही.
नांदेडच्या महिला पोलीसाला लिंग बदलून पुरूष व्हायचय..