नांदेड,(प्रतिनिधी)-भारतीय माजी सैनिक संघटना नांदेड ,जय जवान पतसंस्था व महीला बचतगट नांदेड तर्फे माजी सैनिकांचा वाढदिवस एकत्रित साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नि.सुभेदार लक्ष्मण विश्वास, नि.सुभेदार गोविंद शेवाळकर, मा.सै.विजय शिंदे व इजिं.हरजिंदर सिंघ संधू सामाजिक कार्यकर्ते , शहरजिल्हाध्यक्ष सो.मी. काँग्रेस नांदेड व राष्ट्रीय प्रभारी राहूल गांधी विचार मंच इंडिया मंचावर उपस्थित होते.
यावेळी माजी सैनिक संघटनेच्यावतीने प्रमुख पाहुण्याचा शाल व पुष्पहाराने यथोचित सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी इजिं.हरजिंदर सिंघ संधू यांनी सर्व प्रथम तीनही सत्कार मुर्तीना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व संघटनेच्या उत्तम कार्याची प्रशंसा केली व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
यानंतर संघटनेच्यावतीने नि.सुभेदार लक्ष्मण विश्वास, नि.सुभेदार गोविंद शेवाळकर, मा.सै.विजय शिंदे यांचे एकत्रित केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भारतीय माजी सैनिक संघटना जिल्हा अध्यक्ष रामराव थडके यांनी केले.यावेळी भारतीय माजी सैनिक संघटनेचे शाखा नांदेड कोषाध्यक्ष मुंडे आणि इतर सभासद वाढदिवस कार्यक्रमास उपस्थित होते आणि महिला बचत गट अध्यक्ष व पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.