इस्लापूर,(प्रतिनिधी)- युवकांना अर्धनग्न करून मारहाण करणाऱ्या इस्लापूरच्या सहायक पोलीस निरीक्षकांवर आता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी निलंबनाची कार्यवाही केली आहे.इस्लापूर पोलीस ठाण्यातील अगोदरचे सहायक पोलीस निरीक्षक डेडवाल यांना एसीबीच्या कार्यवाहीत आपले पद गमवावे लागले होते.
इस्लापूर पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांनी काही युवकांना अर्धनग्न करून मारहाण केली.अनेकांसमोर झालेल्या या मारहाणीचा व्हिडीओ अनेक सामाजिक संकेत स्थळांवर व्हायरल झाला.त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या व्हिडिओची चौकशी कंधारचे पोलीस उप अधीक्षक थोरात यांनी करावी असे आदेश दिले. त्यानंतर अनेक प्रसार ,माध्यमांनी मारहाणीच्या वृत्ताला प्रसिद्धी दिली.त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी इस्लापूरचे सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांना जिल्ह्याची जबाबदारी देत नियंत्रण कक्षात बसवले आहे.चौकशी अत्यंत पारदर्शक व्हावी म्हणून शेवाळेंना इस्लापूरला न ठेवता नियंत्रण कक्षात आणले होते.१२ फेब्रुवारी रोजी रघुनाथ शेवाळे यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत.
संबंधित बातमी …..
https://vastavnewslive.com/2023/02/11/ईस्लापूर-पोलीस-ठाण्यात-अ/