मुंबई येथे पार पडलेल्या जलतरणीकण स्पर्धेत नांदेडच्या स्पर्धकांच्या यश

नांदेड(प्रतिनिधी)-मुंबई येथे 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या जलतरणीका स्पर्धेत नांदेड येथील कै.शांताराम सगणे मनपा जलतरणीकेचे जलतरणपट्टू यांनी सहभाग घेवून यश संपादण केले आहे.
मुंबई येथे 59 वी समुद्री स्पर्धा सनरॉक पे गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या स्पर्धेत उत्तम पाटील, प्रकाश बोकारे, ओमप्रकाश गुंजकर, निवृत्ती पिन्नलवार, संघर्ष सोनकांबळे, मयुर केंद्रे, अनन्या देशमुख, अजिंक्य नरवाडे यांनी एक कि.मी., दोन कि.मी., पाच कि.मी., च्या अंतराच्या जलतरण स्पर्धेत सहभाग घेवुन या स्पर्धेमध्ये पारितोषिके संपादन केली. या स्पर्धकांना कै.शांताराम सगणे मनपा जलतरणीकेचे प्रशिक्षक राजे सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडच्या या संघाने यश संपादन केले आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र नांदेड येथे जलतरण प्रेमींनी त्यांना भेटून शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *