नांदेड (प्रतिनिधी)- राज्यातील अभियोग संचालनालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना असे निर्देश देण्यात आले आहेत की, वृत्तपत्रे, आकाशवाणी, दुरदर्शन, वृत्तवाहिण्या यांच्याशी संपर्क ठेवू नये. या आदेशावर अभियोग संचालनालयाचे संचालक एस.एस.शिंदे यांची स्वाक्षरी आहे.
अभियोग संचालनालयाने काढलेल्या आदेशानुसार अभियोग संचालनालयाच्या आस्थापनेवरील अधिकारी हे पुर्व परवानगीशिवाय न्यायालयीन प्रकरणाबाबतीत वृत्तवाहिण्यांना मुलाखती देत आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणुक) नियम 1979 च्या नियम 9 कडे सर्वांनी लक्ष द्यावे या नियमानुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही वृत्तवाहिणीस मुलाखत देण्यास, वृत्तपत्र, नियतकालीक प्रकाशन स्वत:च्या मालकीत ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या नियम क्रमांक 9 नुसार अभियोग संचालनालयातील सर्व उपसंचालक, सहाय्यक संचालक आणि सर्व सरकारी अभियोेक्ते यांना निर्देशीत करण्यात आले आहे की, त्या-त्या अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अशा मुलाखती दिल्यानंतर त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. तसेच अभियोग संचालनालयाच्या आस्थापनेवरील कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयीन कामकाजात लोकप्रतिनिधींचा दबाव आणल्यास त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा(वर्तवणूक) नियम 1979 च्या नियम 23 नुसार शिस्तभंगाची कार्यवाही केली जाणार आहे.
प्रसार माध्यमांना मुलाखत द्याल तर याद राखा; अभियोग संचालकांचा आदेश