नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडचे सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक नांदेड चौफेरचे संपादक हरियाणातील वल्भगड विद्यापिठाने विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) पदवी बहाल केली आहे. 10 फेबु्रवारी रोजी वल्भगड येथे आयोजित एका कार्यक्रमात मोहम्मद आरेफ खान पठाण यांना डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली.
या पदवी प्रदान सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अनुपमा त्रिभुनायत (प्रेसिडेंट ऑफ आर्टीस्ट ऍन्ड वर्ल्ड ऑफ फेडरेशन संघ युनेस्को ऍन्ड नवी दिल्ली) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अनेक कामांमध्ये आपला सामाजिक वसा चालवत मोहम्मद आरेफ खान पठाण यांनी 17 पारीतोषके मिळविली आहेत. त्यांनी आपल्या जीवनात आपल्या आई-वडीलांच्या शिकवणीनुसार भरपूर सामाजिक काम केले आहे. संस्थेचे संचालक डॉ.सी.पी. यादव यांनी आरेफ खान यांना पदवी प्रदान सोहळ्या उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले होते.
मोहम्मद आरेफ खान पठाण यांना हरियाणातील वल्भगड विद्यापीठाने दिली डॉक्टरेट