नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या आजोबाने शेतीची वाटणी करून द्यावी या कारणावरुन झालेल्या हाणामारीत दाखल झालेल्या परस्पर जिवघेणा हल्ला अशा दोन गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यातील तीन आरोपींना देगलूर न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
कबुलपाशा बंदगीसाब कोटग्याळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 फेबु्रवारीच्या सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास त्यांचे बंधू महेमुद बंदगीसाब कोटग्याळे, इब्राहिम महेमुद कोटग्याळे, रुक्मोद्दीन कोटग्याळे सर्व रा.हाणेगाव यांनी आजोबाला सांगून आमचा जमीनीचा हक्क परत देे असे म्हणून मारहाण केली. या मारहाणीत कबुलपाशाच्या काही मंडळीनी सुध्दा महेमुद कोटग्याळेच्या लोकांना मारहाण केली. या प्रकरीण कबुलपाशाच्या तक्रारीवरुन दाखल झालेल्या 307 कलमाखालील गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली. दुसरी पार्टी दवाखान्यात ऍडमीट असल्यामुळे त्यांची अटक शिल्लक राहिली. पकडलेल्या तीन जणांना देगलूर न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक व्ही.टी.गुट्टे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक नामदेव मद्दे हे करीत आहेत.
हणेगावमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी; तीन जणांना पोलीस कोठडी