स्थानिक गुन्हा शाखेत भंडरवार; नांदेड ग्रामीण चिखलीकरांना

45 पोलीस निरिक्षकांना नविन नियुक्त्या
नांदेड(प्रतिनिधी)-काही क्षणापुर्वीच वास्तव न्युज लाईव्हने प्रसिध्द केलेल्या बातमीत नांदेड स्थानिक गुन्हे शाखा आणि नांदेड ग्रमीण पोलीस ठाणे रिकामेच होते असे लिहिले होते. आताच प्राप्त झालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेत पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांची वर्णी लागली आहे.तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे द्वारकादास चिखलीकर यांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. या सर्व प्रकारात सोंगाड्याचे राजकीय प्रयत्न वाऱ्यावर उडून गेले आहेत.
काही क्षणापुर्वीच वास्तव न्युज लाईव्हने पोलीस अधिक्षकांनी केलेल्या बदल्यांची बातमी प्रसिध्द केली होती. त्यात नव्याने हाती आलेल्या माहितीनुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना पाठविण्यात आले आहे. तसेच वजिराबाद येथील पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांना स्थानिक गुन्हा शाखेचे प्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. यामुळे सोंगाड्याचे राजकीय प्रयत्न हवेत उडून गेले आहेत.
सोबतच पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्ह्यातील 45 पोलीस उपनिरिक्षकांना नव्या नियुक्त्या दिल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत. त्यातील नवीन नियुक्ती कंसात लिहिल्या आहेत. प्रविण शिवाजीराव आगलावे-वजिराबाद(क्युआरटी), सरजितसिंघ किशनसिंघ माली-वजिराबाद(नियंत्रण कक्ष), रमेश शंकरराव खाडे-वजिराबाद(इतवारा), भगवान सखाराम सावंत-शिवाजीनगर (भाग्यनगर), विश्र्वजित रामचंद्र रोडे-शिवाजीनगर(वजिराबाद), लक्ष्मण नारायण बोनवाड-भाग्यनगर (नियंत्रण कक्ष), प्रशांत नागोराव जाधव-भाग्यनगर(वजिराबाद), लहु रामजी घुगे-नियंत्रण कक्ष, सध्या भाग्यनगर(नियंत्रण कक्ष),सचिन सुधाकर सोनवणे-भाग्यनगर सध्या स्थानिक गुन्हे शाखा (स्थानिक गुन्हे शाखा), दशरथ अंकुश आडे-विमानतळ (स्थानिक गुन्हे शाखा), कृष्णा राम भक्तकाळे-इतवारा (नियंत्रण कक्ष), दत्ता नरहरी काळे-इतवारा (सोनखेड), चंदसिंह रामसिंह परीहार-सोनखेड(शिवाजीनगर), गोपाळ चंद्रपाल इंद्राळे-कंधार(भाग्यनगर), व्यंकट तुकाराम गंदलवाड-कंधार(लोहा), शिवकुमार बाचावार-नायगाव(कुंटूर), मारोती गोपाळराव सोनकांबळे-लोहा(कंधार), घनशाम परशुराम वडजे-देगलूर(नायगाव), रवि केरबा मुंडे-देगलूर(विमानतळ), विशाल प्रल्हाद सुर्यवंशी-कुंडलवाडी (मुक्रामाबाद), गोपीनाथ आदिनाथ वाघमारे-मुक्रामाबाद(मुखेड), दिनेश शिवाजीराव येवले-कुंटूर(कुुंडलवाडी), अनिल विठ्ठलराव कांबळे-भोकर(हदगाव), सुर्यकांत मारोती कांबळे-भोकर(मनाठा), दिगंबर पांडूरंग पाटील-भोकर(अर्धापूर), नागोराव विठ्ठलराव मोरे-हदगाव(भोकर), तुळीराम योगीराज चिटेवार-मनाठा (भाग्यनगर), साईनाथ काशिनाथ सुरवसे-अर्धापूर(भोकर), बळीराम व्यंकटराव राठोड-अर्धापूर(जनसंपर्क अधिकारी), जमाखान अंबियाखान पठाण- मांडवी (इस्लापूर), योगेश बाबूराव बोधगिरे-ईस्लापूर (क्युआरटी), गणेश संजाबराव पवार-किनवट(नियंत्रण कक्ष), चितरंज ग्यानोबा ढेमकेवाड-विमानतळ सुरक्षा (क्युआरटी), सोपान नारायण थोरवे-शिवाजीनगर सध्या सायबर सेल(क्युआरटी), शिवानंद बापूअप्पा स्वामी-शहर वाहतुक शाखा(नियंत्रण कक्ष), स्नेहा सखाराम पिंपरखेडे-प्रशिक्षण विभाग(नांदेड ग्रामीण), प्रसेनजित चंद्रकांत जाधव-बॉम्ब शोधक व नाशक पथक(शिवाीनगर), कृष्णा रामभगत काळे-नियंत्रण कक्ष सलगन इतवारा(लोहा), गजानन काळे-मुखेड(मुक्रामाबाद), माधुरी अजय यावलीकर-मुदखेड(प्रशिक्षण शाखा), गोविंद बालाजी जाधव-नियंत्रण कक्ष (नांदेड ग्रामीण), प्रदीप भानुदास गौंड-विमानतळ (जिल्हा विशेष शाखा), अमोल विठ्ठल पुंडे-जिल्हा विशेष शाखा(पोलीस ठाणे देगलूर) असे आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेची बदली ही पुढे काय-काय नवीन रंग आणणार आहे हे काही दिवसांतच दिसेल. पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी या राजकीय दबावाला कंटाळून आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाकडे दाद मागणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. कारण ते कालपासूनच सुट्टीवर आहेत आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या तात्पुरता प्रभार पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे यांच्याकडे आहे. वास्तव न्युज लाईव्हने यासंदर्भाने सुध्दा मागेच सर्व वृत्त सविस्तर प्रकाशीत केले होते. त्यामुळे ज्यांनी आपल्या गुडघ्याला बाशिंगे बांधली होती त्यांच्यासाठी पुन्हा प्रयत्न करा किंवा अरे रे.. असेच शब्द लिहिणे योग्य ठरणार आहे.
संबंधीत बातमी…

https://vastavnewslive.com/2023/02/20/अशोकराव-घोरबांड-साहेबांन/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *