ज्याचा मास्टर माईंड श्रीकृष्ण आहे त्याच्या नादाला कोणी लागू नये; चिखलीकरांच्या बदलीला स्थगिती

नांदेड(प्रतिनिधी)-राजकीय दबावाला बळी पडून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काल केलेल्या 85 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होता. त्यातील महत्वपूर्ण बदली स्थानिक गुन्हा शाखेची होती. आपल्या बदली विरुध्द बदलेले पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाकडे कालच दाद मागितली आणि आज न्यायाधीकरणाने द्वारकादास चिखलीकर यांच्या बदलीला स्थगिती दिली आहे. महाभारतात असे म्हटले गेले ज्याचा मास्टर माईंड श्रीकृष्ण आहे त्याच्या नादाला कोणी लागू नये, शंभरातला एकही वाचला नाही आणि पाचातील एकालाही धक्का लागला नाही. म्हणूनच हजारो वर्षापासून श्रीकृष्णाच्या नावाचा जयघोष आजही होतच आहे.
महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यातील पोलीस अधिक्षकांनी आपल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात सर्वात शेवटचा क्रमांक नांदेड जिल्ह्याचा लागला. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या बदल्या करतांना काही राजकीय दबावाला काहीसा प्रतिसाद आणि काहीसा विरोध दाखवत आपल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. अनेक जण अडगळीत पडले होते. त्यांना चांगल्या नियुकत्या मिळाल्या. महत्वपुर्ण बदल पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हा शाखा या पदाचा होता. 20 फेबु्रवारी रोजी सकाळी या आदेशांची निर्गती सार्वजनिक झाली. त्यात स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर जगदीश भंडरवार यांचा क्रमांक लागला होता आणि द्वारकादास चिखलीकरांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे बहाल करण्यात आले होते. एखाद्या गोष्टीवर आपण सत्य हा पाया धरुन चाललोत तर त्रास होईल पण वाईट कधीच होत नाही हे सदैव सत्य आहे. पोलीस अधिक्षकांवर दबाव आणणाऱ्या सत्ताधारी राजकीय पुढाऱ्याने आपल्या स्वत:वर जास्त अति विश्र्वास दाखवला आणि जो माणुस या जिल्ह्यातच नाही त्याची शिफारस स्थानिक गुन्हा शाखेसाठी केली. तेवढे दिवस ते पद रिकामे ठेवण्याची सुचनाही केली. पण पोलीस अधिक्षकांना नांदेड जिल्ह्यातील जवळपास 4 हजार पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच 24 लाख जनता या सर्वांचा विचार करायचा असतो. यात श्रीकृष्ण कोकाटे यांना दिसले की एक मोठा समुदाय हा चिखलीकरांच्या विरोधात आहे आणि तो विरोध फक्त त्यांनी रेकॉर्डबे्रक कार्यकाळात स्थानिक गुन्हा शाखेवर प्रबुत्व गाजविल्यासाठीचा आहे. यात रेकॉर्डब्रेक काळात त्यांनी केलेल्या कामाला बेदखल करत त्यांना काढून टाकण्याची इच्छा ठेवणाऱ्यांची आता नामुश्की झाली आहे.
वास्तव न्युज लाईव्हने त्यांच्या पोलीस सेवा काळाचे सात महिने शिल्लक आहेत म्हणून माझी बदली करून नये असा अर्ज सुध्दा दिला होता. यावृत्ताला प्रसिध्दी सुध्दा दिली होती आणि ते पुढे न्यायाधीकरणाकडे जाणार आहेत असे भाकित सुध्दा वर्तवले होते.आत ते वास्तव न्युज लाईव्हचे भाकित खरे ठरले. 20 फेबु्रवारी रोजी पहाटेपासून पोलीस अधिक्षकांनी केलेल्या बदल्या सार्वजनिक झाल्या आणि 10.30 वाजता न्यायाधीकरणाचे दार उघडताच द्वारकादास चिखलीकरांनी अगोदरच तयारी करून ठेवलेला अर्ज न्यायाधीकरणात दाखल झाला. 21 फेबु्रवारीच्या सुरूवातीच्या वेळेतच न्यायाधीकरणाने द्वारकादास गोविंदरावजी चिखलीकर यांच्या मागणीला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या झालेल्या बदलीला सध्या स्थगिती दिली आहे. पुढे हा कायद्याचा प्रश्न आहे, कायद्याच्या अनेक प्रक्रिया असतात. ज्या प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी खुप मोठा असतो. तो पर्यंत चिखलीकरांच्या सेवानिवृत्तीचा काळ येईल. किंबहुना त्यांना दोन वर्षाची मुदत वाढ सुध्दा मिळेल. ज्या पुढाऱ्याने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना एलसीबीची जागा रिकामी ठेवण्याची सुचना केली होती. त्यांनीच एका भरगच्च पत्रकार परिषदेत जेवढे कायदे तयार होता त्या प्रत्येक कायद्याला पळवाटा सुध्दा असता असे सांगितले होते. आता त्याच पळवाटांचा उपयोग द्वारकादास चिखलीकरांनी घेतलेला आहे. त्यामुळे नेताजींना सुध्दा काही वाईट वाटण्याचे कारण नाही. म्हणूनच महाभारत घडले होते तेंव्हा जी काही प्रक्रिया त्यावेळेस घडली त्यानंतर श्रीकृष्णाबद्दल आजही बोलले जात आहे की, ज्याचा मास्टर माईंड श्रीकृष्ण आहे त्याच्या नादाला कोणी लागू नये, शंभरातला एकही वाचला नाही आणि पाचमधील एकालाही धक्का लागला नाही. एकूणच आता चिखलीकर पुन्हा स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर बसणार हे निश्चित झाले आहे. जगदीश भंडरवारांना आता काही दिवस वाट पाहावी लागेल. बहुदा त्यांना चिखलीकरांच्या जागी अर्थात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पाठविले जाईल असे वाटते.चिखलीकर यांची बाजू न्यायाधिकरणाकडे ॲड सिद्धेश्वर ठोंबरे यांनी मांडली

चिखलीकरांना दक्षतेची गरज
सव्वा तीन वर्षाचा कार्यकाळ स्थानिक गुन्हा शाखेत काम केल्यानंतर आपसुकच अनेक शत्रु चिखलीकरांसाठी तयार झालेले आहेत. प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या निर्णयानंतर या शत्रुंमध्ये वाढ होणारच आहे. त्यातल्या त्यात कक्ष क्रमांक 11 मध्ये असणाऱ्या सुर्याजी पिसाळांना त्यांनी शोधण्याची गरज आहे. बाहेरचे काही मिर सादीक त्यांच्याकडे येवून बसतात. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर चिखलीकरांनी बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. तरच त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामामुळे तयारी झालेली त्यांची प्रतिमा कायम राहिल नसता बिघडण्यासाठी एक क्षण सुध्दा पुरेसा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *